Join us  

IPL 2024 चा दुसरा टप्पा भारताबाहेर होणार? BCCI चे अधिकारी चाचपणीसाठी परदेशात

काही आयपीएल संघांनी त्यांच्या खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 10:35 AM

Open in App

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ च्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढील वेळापत्रक समोर येईल. पण, निवडणुकीच्या आणि आयपीएल सामन्यांच्या तारखा यात क्लॅश होत असल्याने आयपीएल २०२४ चा दुसरा टप्पा भारताबाहेर खेळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बीसीसीआयचे काही अधिकारी आयपीएलच्या दुसरा टप्पा कुठे खेळवता येईल याची चाचपणी करण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेले आहेत.

"भारतीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी ३ वाजता निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर, आयपीएलचे सामने दुबईला हलवायचे की नाही याचा निर्णय बीसीसीआय घेईल. सध्या बीसीसीआयचे काही उच्चपदस्थ अधिकारी दुबईत आहेत. दुबईत आयपीएलचा दुसरा टप्पा खेळवता येईल का, याच्या चाचपणीसाठी ते गेले आहेत,” अशी माहिती TOIला सूत्रांनी दिली.

काही आयपीएल संघांनी त्यांच्या खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. यामुळे आयपीएलचा दुसरा टप्पा भारताबाहेर हलवण्याबाबतही अटकळ सुरू झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएल २०१४ चा पूर्वार्ध देखील UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता.

बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये २१ सामन्यांचा समावेश आहे. या वेळापत्रकातील शेवटचा सामना ७ एप्रिल रोजी लखनौ येथे लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने २२ मार्चपासून आयपीएल २०२४ ला सुरुवात होईल. २०२० मध्ये कोरोनामुळे UAE त आयपीएल आयोजित करण्यात आले होते. जेव्हा दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन ठिकाणी सामने आयोजित केले गेले होते.

IPL 2024 वेळापत्रक२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ 

टॅग्स :आयपीएल २०२४संयुक्त अरब अमिरातीबीसीसीआय