Join us

पुढील वर्षी आयपीएलमध्ये नक्की परतेन : डिव्हिलियर्स

माजी कर्णधार विराट कोहली यादेखील अलीकडे डिव्हिलियर्स पुढील सत्रात संघासोबत कुठल्या तरी भूमिकेत असेल, असे सुतोवाच केले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 05:35 IST

Open in App

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स  हा पुढील सत्रात आरसीबी संघात कुठल्या तरी भूमिकेत दिसणार आहे. डिव्हिलियर्स या संघाचा अविभाज्य भाग असून त्याने मागच्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती.

माजी कर्णधार विराट कोहली यादेखील अलीकडे डिव्हिलियर्स पुढील सत्रात संघासोबत कुठल्या तरी भूमिकेत असेल, असे सुतोवाच केले होते. व्हीयू स्पोर्ट्सशी बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला, ‘विराटने माझ्या शब्दाला दुजोरा दिल्याचा आनंद आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्या काहीही नक्की नाही. मी आयपीएलमध्ये पुढच्या सत्रात नक्की परत येईन. भूमिका कोणती असेल हे मात्र माहिती नाही. काही सामने बंगळुरू येथे होतील, असे कळले आहे. हे शहर माझे दुसरे घर आहे, खच्चून भरलेल्या चिन्नास्वामीवर खेळायची इच्छा आहे. पुनरागमनाची प्रतीक्षा करीत आहे.’ डिव्हिलियर्सने आरसीबीसाठी तीन शतके आणि ४० अर्धशतकांसह ५१६२ धावा केल्या आहेत.

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सआयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App