Join us

यष्टिरक्षक वृद्धिमान सहाचं बॉलिवूड स्टार सारा अली खानसाठी खास ट्विट!

नवीन नायिका सारा अली खान ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 12:54 IST

Open in App

मुंबई : रणवीर सिंगचा सिम्बा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल आहे. या चित्रपटात नवीन नायिका सारा अली खान ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या सुंदरतेनं अनेक युवकांना घायाळ केलं आहे. सौंदर्यानेच नव्हे तर सक्षम अभिनयाच्या जोरावरही तिने आपल्या फॅन्सची संख्या झपाट्याने वाढवली आहे. त्यामुळेच भारतीय संघाचा यष्टिरक्षक वृद्धिमान सहाने तिच्यासाठी एक ट्विट केलं.

सारा अली खानसाठी 34 वर्षीय सहाने एक स्पर्धक सूचवली आहे. त्याच्या मते ही स्पर्धक सारा अली खानला आव्हान देण्याची क्षमता राखते. ती स्पर्धक दुसरी कुणी नसून सहाची कन्या अन्वी आहे. सिम्बा चित्रपटातील गाण्यावर अन्वी नृत्य करतानाचा व्हिडीओ सहाने ट्विटरवर पोस्ट केला आणि तो सारासह दिग्दर्शक करण जोहर व धर्मा प्रोडक्शन हाऊसलाही टॅग केला. ''सारा अली खानला नवीन स्पर्धक...'', असे त्याने पोस्टवर लिहिले. दुखापतीमुळे सहा क्रिकेटपासून दूरावला आहे. त्यामुळे त्याला इंग्लंड व ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्याच्या जागी कसोटी संघात रिषभ पंतला संधी मिळाली.   

 

टॅग्स :वृद्धिमान साहासारा अली खानसिम्बा