Join us  

बाबो... एकाच चेंडूवर बेल्सही उडाल्या अन् षटकारही गेला, पाहा कसा तो?

क्रिकेटच्या इतिहासात असं कधी घडलंच नव्हतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 4:38 PM

Open in App

गतवर्षी जून - जुलै महिन्यात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान इंग्लंड संघानं जेतेपद पटकावलं. या जेतेपदासह इंग्लंड संघानं इतिहास रचला होता. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून ते विजयपथावर परतले होते. आजच्याच तारखेला वर्षभरापूर्वी इंग्लंडने तो विजय मिळवला होता. त्या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या फलंदाजांची बेल्स उडाली आणि तो चेंडू थेट सीमारेषेपार गेला. 

या सामन्यात इंग्लंडने  6 बाद 386 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांच्या गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना बांगलादेशला 280 धावांपर्यंतच रोखले. जेसन रॉयच्या 153 धावा आणि जॉनी बेअरस्टो ( 51),  जोस बटलर (65) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या उभी केली. बांगलादेशच्या शकिब अल हसनने शतकी खेळी करून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, त्याला अपयश आले. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड यांनी बांगलादेशला जोरदार धक्के देत विजयात खारीचा वाटा उचलला.  

387 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना बांगलादेशला चौथ्याच षटकात धक्का बसला. बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. सौम्याची ही विकेट मात्र थोडी विचित्र ठरली. आर्चरने टाकलेला चेंडू यष्टिंचा वेध घेत सीमारेषेपार गेला( म्हणजे थेट षटकारच)... क्रिकेटमध्ये अशी विचित्र घटना प्रथमच घडली असावी.  

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...

वर्ल्ड कप होणार नसेल, तर ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 मालिका खेळण्यात अर्थ नाही - बीसीसीआय

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडबांगलादेश