Zimbabwe vs West Indies, 44th Match : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांनी पॉवर हिटिंग शोचा खास नजराणा पेश केला. या दोघांनी केलेल्या स्फोटक फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाने सुपर ८ मधील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला आहे. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना कॅरेबियन संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २५४ धावा केल्या. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
टी२० विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्येचा रेकॉर्ड
- २६०/६ - श्रीलंका विरुद्ध केनिया, जोहन्सबर्ग, २००७
- २५४/६ - वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे, वानखेडे, २०२६*
- २३५/५ - आयर्लंड विरुद्ध ओमान, कोलंबो एसएससी, २०२६
- २३०/८ - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, वानखेडे, २०१६
- २२९/४ - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, वानखेडे, २०१६
- २२५/५ - श्रीलंका विरुद्ध ओमान, पल्लेकेले, २०२६
हेटमायर आणि रोव्हमॅन पॉवेलचा पॉवर हिटिंग शो!
झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रँडन किंग आणि शाय होप या कॅरेबियन सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडण्यात झिम्बाब्वेच्या संघाला यश मिळाले. पण त्यानंतर मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमॅन पॉवेल यांच वादळ घोंगावलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूत १२२ धावांची दमदार भागीदारी रचली. शिमरॉन हेटमायरने ३४ चेंडूत ८५ धावांची वादळी खेळी केली. रोव्हमन पॉवेल याने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली.
लोअर ऑर्डरमधील बॅटर्संनीही दाखवली बॅटिंगमधील धमक अन्...
अखेरच्या षटकात शेरफन रुदरफोर्ड याने १३ चेंडूत केलेल्या ३१ धावा, रोमिओ शफर्डनं १० चेंडूत कुटलेल्या २१ धावा आणि जेसन होल्डरनं ४ चेंडूत १३ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर २५४ धावा लावल्या.
Web Summary : Hetmyer and Powell's explosive batting propelled West Indies to 254/6 against Zimbabwe in Mumbai. This is the second-highest score in T20 World Cup history. West Indies dominated with powerful hitting.
Web Summary : हेटमायर और पॉवेल की विस्फोटक बल्लेबाजी से वेस्टइंडीज ने मुंबई में जिम्बाब्वे के खिलाफ 254/6 का विशाल स्कोर बनाया। यह टी20 विश्व कप के इतिहास का दूसरा सबसे बड़ा स्कोर है। वेस्टइंडीज का दबदबा रहा।