Join us  

WI vs NZ T20I : १ चौकार, १ षटकारसह १५ धावा! मार्टिन गुप्तीलने मोडला Rohit Sharma चा वर्ल्ड रेकॉर्ड

वेस्ट इंडिजने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवून मालिकेतील व्हाईट वॉश टाळला. न्यूझीलंडने ही मालिका २-१ अशी जिंकली, परंतु तिसऱ्या सामन्यात विंडीजने विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 2:05 PM

Open in App

वेस्ट इंडिजने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवून मालिकेतील व्हाईट वॉश टाळला. न्यूझीलंडने ही मालिका २-१ अशी जिंकली, परंतु तिसऱ्या सामन्यात विंडीजने विजय मिळवला. किवींच्या ७ बाद १४५ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजने २ बाद १५० धावा केल्या. ८ वर्षांनंतर विंडीजने किवींवर ट्वेंटी-२०त विजय मिळवला. पण, या सामन्यात १ चौकार १ षटकारसह १५ धावा करणाऱ्या मार्टिन गुप्तीलने ( Martin Guptill) वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवताना भारताचा कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) मागे टाकले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवींकडून ग्लेन फिलीप्सने सर्वाधिक ४१ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे ( २१), कर्णधार  केन विलियम्सन ( २४) यांनी हातभार लावला. गुप्तीने १३ चेंडूंत १ चौकार व १ षटकार मारून १५ धावा केल्या, तरी त्याच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. किवींना ७ बाद १४७ धावा करता आल्या. ब्रेंडन किंग ( ५३) व शामराह ब्रुक्स ( ५६) यांच्या अर्धशतकांनी विंडीजचा विजय पक्का केला. रोव्हमन पॉवेलने १५ चेंडूंत नाबाद २७ धावा केल्या. विंडीजने १९ षटकांत ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

मार्टिनच्या १५ धावांच्या खेळीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर केला. मार्टिन ३४९७ धावांसह आता टॉपवर आहे. भारताचा रोहित शर्मा ३४८७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आगामी आशिया चषक स्पर्धेत रोहितला पुन्हा हा विक्रम स्वतःच्या नावावर करण्याची संधी आहे. विराट कोहली ( ३३०८), पॉल स्टर्लिंग ( २९७५) व आरोन फिंच ( २८५५) हे टॉप फाईव्हमध्ये आहेत.

टॅग्स :रोहित शर्माटी-20 क्रिकेटन्यूझीलंडवेस्ट इंडिज
Open in App