WI vs ENG, T20I : Wd, 0, 4, 4, Wd, 6, 6, 6; Akeal Hoseinनं अखेरच्या षटकात चोपल्या २८ धावा, पण इंग्लंडनं १ धावेनं जिंकला सामना अन्...

West Indies lost by 1 run against England : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात थरार पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 10:47 AM2022-01-24T10:47:16+5:302022-01-24T10:47:44+5:30

whatsapp join usJoin us
WI vs ENG, T20I : Wd 0 4 4 Wd 6 6 6, Akeal Hosein smashed 28 runs in the last over, West Indies fell two runs short of victory agains England | WI vs ENG, T20I : Wd, 0, 4, 4, Wd, 6, 6, 6; Akeal Hoseinनं अखेरच्या षटकात चोपल्या २८ धावा, पण इंग्लंडनं १ धावेनं जिंकला सामना अन्...

WI vs ENG, T20I : Wd, 0, 4, 4, Wd, 6, 6, 6; Akeal Hoseinनं अखेरच्या षटकात चोपल्या २८ धावा, पण इंग्लंडनं १ धावेनं जिंकला सामना अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

West Indies lost by 1 run against England : वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात थरार पाहायला मिळाला. विजयासाठी १७२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं १५.१ षटकांत ९८ धावांत ८ फलंदाज गमावले होते. इथून वेस्ट इंडिज पुनरागमन करेल असा अंदाज इंग्लंडनंही बांधला नसावा. पण, रोमारिओ शेफर्ड व अकिल होसैन यांनी ९व्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. २०व्या षटकात विजयासाठी ३० धावांची गरज असताना होसैननं ४,४,६,६,६ अशी आतषबाजी केली, त्यात गोलंदाज साकिब महमूदनं दोन  Wide चेंडू टाकले.. तरीही वेस्ट इंडिजला १ धावेनं पराभव पत्करावा लागला.
 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडनं ८ बाद १७१ धावा केल्या. जेसन रॉय ( ४५), टॉम बँटन ( २५), मोईन अली (  ३१) व ख्रिस जॉर्डन ( २७) यांनी इंग्लंडच्या धावसंख्येत योगदान दिले. जेसन होल्डर व फॅबियन एलन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात निराशाजनक झाली. ब्रँडन किंग व शे होप हे फलकावर ६ धावा असताना माघारी परतले. निकोलस पूरन ( २४) व डॅरेन ब्राव्हो ( २३) यांनी संघाला आधार दिला, परंतु मोईन अली व आदिल राशिद यांनी अनुक्रमे दोघांना माघारी पाठवले. कर्णधार किरॉन पोलार्ड व जेसन होल्डर हे प्रत्येकी १ धावेवर माघारी परतले. त्यात ओडीन स्मिथही ७ धावांवर व फॅबियन १२ धावांवर माघारी परतल्यानंतर विंडीजची अवस्था १५.१ षटकांत ८ बाद ९८ अशी झाली होती.

२९ चेंडूंत विजयासाठी ७४ धावांचा पाठलाग करताना रोमारिओ शेफर्ड व अकिल होसैन यांनी दमदार खेळ केला. शेफर्डनं २८ चेंडूंत १ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ४४ धावा केल्या. होसैनही १६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४४ धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या षटकात विजयासाठी ३० धावांची गरज असताना होसैन विरुद्ध महमूद अशी रंगत झाली. महमूदनं पहिला चेंडू Wide टाकला त्यानंतर पुढील चेंडू निर्धाव राहिला. दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर होसैननं चौकार खेचले. चौथा चेंडू पुन्हा Wide गेला अन् पुढीत तीनही चेंडू होसैननं सीमापार पाठवले. पण, विंडिजला तो ८ बाद १७० धावांपर्यंतच घेऊन जाऊ शकला. मोईन अलीनं तीन ,तर राशिदनं दोन विकेट्स घेतल्या. 

Web Title: WI vs ENG, T20I : Wd 0 4 4 Wd 6 6 6, Akeal Hosein smashed 28 runs in the last over, West Indies fell two runs short of victory agains England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.