Join us  

Video : किरॉन पोलार्डचा 'दुटप्पी'पणा पुन्हा जगासमोर आला, IPL मधील 'ती' कृती व्हायरल झाली!

ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात 6 विकेट्स अन् 117 चेंडू राखून विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 7:13 PM

Open in App

ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात 6 विकेट्स अन् 117 चेंडू राखून विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना गमतीशीर प्रसंग अनुभवायला मिळाला, परंतु त्याचवेळी विंडीजच्या किरॉन पोलार्डचा दुटप्पीपणाही समोर आला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 18व्या षटकात कर्णधार पोलार्डनं फलंदाज मॅथ्यू वेडला 'मंकडिंग'ची वॉर्निंग दिली. फिरकी गोलंदाजी करणाऱ्या पोलार्डनं वेडला बाद करण्याएवजी त्याला वॉर्निंग दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण, त्याचवेळी इंडियन प्रीमिअर लीगमधील त्याच्या एका कृतीचीही जोरदार चर्चा सुरू झाली. (  Australia thrashed West Indies by six wickets to clinch the ODI series 2-1)

तिसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या विंडीजचा डाव 45.1 षटकांत 152 धावांवर गडगडला. एव्हिन लुईसनं नाबाद 55 धावा करूनही अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्यानं विंडीजचा डाव गडगडला. मिचेल स्टार्कनं 3 विकेट्स घेतल्या, तर जोश हेझलवूड, अॅश्टन अॅगर आणि अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. प्रत्युत्तरात मॅथ्यू वेडनं नाबाद 52 व कर्णधार अॅलेक्स केरी 35 धावा करून संघाला 6 विकेट्स व 117 चेंडू राखून सहज विजय मिळवून दिला. 

पाहा व्हिडीओ...   दरम्यान, आयपीएलमध्ये खेळताना पोलार्ड गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी स्वतः क्रिजच्या किती पुढे जातो त्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :किरॉन पोलार्डआॅस्ट्रेलियावेस्ट इंडिजआयपीएल २०२१
Open in App