Join us  

WI vs AUS 2021 : अम्पायरनं नो बॉल दिला म्हणून किरॉन पोलार्ड 'विचित्र' वागला; विंडीजला 10 खेळाडूंसह खेळावे लागले, Video 

West Indies Vs Australia : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. यजमान विंडीज संघाला 10 खेळाडूंसहच मैदानावर खेळावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 3:13 PM

Open in App

West Indies Vs Australia : वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात विचित्र प्रकार पाहायला मिळाला. यजमान विंडीज संघाला 10 खेळाडूंसहच मैदानावर खेळावे लागले. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना विंडीज कर्णधार किरॉन पोलार्ड पंचांनी फ्री-हिट दिल्यानंतर थेट सीमारेषेबाहेर जाऊन उभा राहिला. 

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 17व्या षटकात हा विचित्र प्रकार घडला. अकिल होसैननं टाकलेला दुसरा चेंडू अम्पायरनं नो बॉल दिला. विंडीजनं 30 यार्डाच्या सर्कलबाहेर जास्तीचे खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभे केले होते. स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या अम्पायरला ही बाब लक्षात आली अन् अकिलनं टाकलेला चेंडू अवैध ठरवला गेला. 

ऑस्ट्रेलियाच्या संघाल फ्री हिट मिळाला आणि फलंदाजानं स्ट्राईक चेंज न केल्यामुळे आहे ते क्षेत्ररक्षण बदलण्यास परवानगी नसते. पोलार्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत होता आणि नियमानुसार त्याला तिथेच रहावे लागले असते. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पोलार्डनं सीमारेषेबाहेर जाऊन उभं राहणं गरजेचं समजलं.  

त्यामुळे फ्री हिटच्या चेंडूवर विंडीजला 10 खेळाडूंसहच मैदानावर क्षेत्ररक्षण करावे लागले. मिचेल स्टार्कनं त्या चेंडूवर खणखणीत प्रहार केला, पंरतु त्याला एक धाव घेता आली. त्यानंतर पोलार्ड पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या 188 धावांचे लक्ष्य विंडीजनं चार विकेट्स राखून सहज पार केले अन् मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.

टॅग्स :किरॉन पोलार्डवेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया
Open in App