Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुमराह संदर्भातील ती गोष्ट लपवायला हवी होती! माजी क्रिकेटरला सत्य पचनी पडेना; कारण...

आपण टॉस वेळीच संघ जाहीर करतो. मग... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:02 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराह किती सामने खेळणार? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली अन् जसप्रीत बुमराह मोजक्या सामन्यातच मैदानात उतरणार ही चर्चा सुरु झाली. इंग्लंड दौऱ्यावर तो फक्त ३ सामने खेळणार याला नवनियुक्त कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही दुजोरा दिला. आता यावर माजी क्रिकेटर आणि विद्यमान समालोचक आकाश चोप्रानं प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.संघातील प्रमुख गोलंदाजासंदर्भातील ही गोष्ट सीक्रेट ठेवायला हवी होती, असे आकाश चोप्राला वाटते. यामागचं कारणही त्याने सांगितले आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आपण टॉस वेळीच संघ जाहीर करतो. मग... 

आकाश चोप्रानं आपल्या यूट्युब चॅनेलवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की, बुमराह फक्त तीन सामने खेळणार ही गोष्ट सार्वजनिक करण्याची गरज होती का? ही गोष्ट सीक्रेट का नाही ठेवली गेली? अजूनही आपण टॉस वेळीच संघ जाहीर करतो. मग सातत्याने बुमराहला फक्त ३ सामन्यात खेळणार हे प्रतिस्पर्धी इंग्लंडला आपण का सांगतोय? असा प्रश्न माजी क्रिकेटरनं उपस्थितीत केला.

अंदाज देऊन आपण इंग्लंडला टेन्शन फ्री केलंय

पहिल्या सामन्यानंतर इंग्लंडच्या संघाला तो फक्त ४ सामन्यातील २ सामने खेळणार यांचा अंदाज आला असेल. त्यात दुसऱ्या सामन्यात बुमराह मैदानात उतरला की, उर्वरित ३ पैकी २ सामन्यात तो नसेल, ही गोष्ट अगदी स्पष्ट होईल. ही गोष्ट इंग्लंडसाठी मनोबल वाढवणारी ठरेल, असे मंत आकाश चोप्रानं व्यक्त केले आहे. जसप्रीत बुमराह म्हणजे टीम इंडियाचे ब्रह्मास्त्र आहे. तो किती कसोटी सामन्यात खेळणार त्याचा अंदाज आपण प्रतिस्पर्ध्याला लागू द्यायला नको होता. बुमराह संदर्भात गाजावाजा करून आपण इंग्लंडला टेन्शन फ्री केलंय, ही गोष्टही आकाश चाप्राने बोलून दाखवलीये.

  बुमराहनं पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात मारला 'पंजा' 

जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या. पण दुसऱ्या डावात त्याला विकेट मिळाली नव्हती. वर्कलोड मॅनेजमेंटच्या पार्श्वभूमीवर तो मोजके सामने खेळणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या मैदानातील चॅलेंज परतवणे हे एक मोठे आव्हान टीम इंडियासमोर असेल. बुमराहसंदर्भातील गोष्ट गुलदस्त्यात ठेवून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकणे निश्चितच शक्य झाले असते. 

 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५जसप्रित बुमराहभारत विरुद्ध इंग्लंड