भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा ही जोडी पर्सनल लाइफमधील गोष्टींमुळे चर्चेत आहे. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून ते वेगळे होणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात या जोडीनं मात्र अद्याप मौन बाळगलं आहे. सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चेवर युजवेंद्र चहल किंवा धनश्री वर्मा दोघांनी स्पष्ट बोलणं टाळलं असलं तरी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून रहस्यमयी पोस्टसह दोघही या गोष्टीला खतपाणी घालताना दिसून येते. त्यात आता युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मासह माजी क्रिकेटर शिखर धवनचा एक व्हिडिओ व्हायरला होताना दिसतोय.
धवननं केला होता चहलचा पर्दाफाश
सोशल मीडियावर काहीजण धनश्री वर्माला ट्रोल करत आहेत. यात तिचे काही जुने व्हिडिओही व्हायरल होताना दिसते. यात आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. शिखर धवन याने चहलचा पर्दाफाश करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात धनश्री वर्माची झलकही पाहायला मिळाली होती. हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर नव्यानं धुमाकूळ घालताना दिसतोय.
बायकोसाठी चहल झालेला हमाल
जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो भारतीय संघ धवनच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता त्यावेळीचा आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन याने युजवेंद्र चहल हा पत्नीसह आपल्या सर्व बॅग्ज अन् सुटकेस एकटाच घेऊन जाताना दिसते. बायकोसाठी हमाल झालाय, अशी मजेशीर कमेंटही शिखर धवन याने केली होती.
धवनच्या प्रश्नावर धनश्रीनं असा दिला होता रिप्लाय
एवढेच नाही तर यावेळी एक छोटी बॅग घेऊन चहलच्या मागे मागे फिरणाऱ्या धनश्री वर्मालाही त्याने प्रश्न विचारला होता. सगळं ओझं बिचाऱ्या एकट्याने उचललंय! याबद्दल तुला काय सांगशील? यावर धनश्री म्हणाली होती की, माझ्या पायाला दुखापत झालीये. नाहीतर एरव्ही मीच सगळ्यांच ओझं उचलते. शिखर धवन या व्हिडिओत असंही म्हणतो की, हमारी नन्ही जान का क्या? यावर धनश्री म्हणते तो आणखी स्टाँग होईल.
Web Title: 'Why do we know our little ones?' Dhanashree replied to Dhawan's question; Video goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.