Why Chris Woakes Retired From International Cricket Before Ashes Series : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिस वोक्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या प्रतिष्ठित अॅशेस मालिकेआधी इंग्लंडच्या या खेळाडूनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली. फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यासाठी तो प्रयत्नशील राहणार असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागल्यावर त्याला कोण अन् किती भाव देईल? हा एक मोठा प्रश्नच आहे. इथं एक नजर टाकुयात या क्रिकेटरनं निवृत्ती घेण्यामागचं कारण...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका हाताने बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरत दाखवली होती लढवय्या वृत्ती
इंग्लंड-भारत यांच्यातील तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी स्पर्धेतील कसोटी मालिकेत करुण नायरनं मारलेला एक फटका अडवताना तो सीमारेषेवर धडपडला. त्याने एक धाव वाचवली. पण खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. लंडन येथील किंग्सटन ओव्हलच्या घरच्या मैदानात टीम इंडियानं इंग्लंडला खिंडीत पकडल्यावर मोडक्या खांद्यासह तो मैदानात उतरला. एका हाताने बॅटिंग करण्याचा त्याने घेतलेल्या धाडसी निर्णयाला क्रिकेट जगतानं सलाम केलं. पण ही दुखापत त्याच्या करिअर आड आली. आता एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं का? हे अर्ध सत्य आहे. त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे दिसते.
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
संघ व्यवस्थापनाची ती भूमिका अन्....
टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आगामी अॅशेस मालिकेला तो मुकणार हे स्पष्ट होते. पण ही दुखापत करिअरला ब्रेक लावणारी ठरली. यामागचं खरं कारण हे इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने त्याच्यासंदर्भात स्पष्ट केलेली भूमिका हेच आहे. टीम इंडियाविरुद्ध गरज असताना जो खेळाडू हात गळ्यात अडकून मैदानात उतरला तो संघाच्या भविष्यातील प्लॅनिंगचा भाग नाही, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर रॉब की यांनी स्पष्ट केले होते. संघ व्यवस्थापानाच्या या भूमिकेमुळे भवितव्य अंधारात असल्याचे लक्षात आल्यामुळेच क्रिस वोक्सनं निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे दिसते.
कशी राहिलीये आंतरराष्ट्रीय कारकिर्द
क्रिस वोक्स हा २०१९ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रमुख खेळाडू होता. याशिवाय २०२२ मध्ये संघाला टी २० वर्ल्ड चॅम्पियन करण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१३ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूनं ६२ कसोटी सामन्यात १९२ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत छाप सोडताना त्याच्या भात्यातून एक शतक आणि ७ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. १२२ वनडे आणि ३३ टी-२० सान्यात त्याच्या खात्यात अनुक्रमे १७३ आणि ३१ विकेट्स जमा आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने ३७०४ धावा काढल्या आहेत.
Web Title : क्रिस वोक्स का संन्यास: बहादुरी और टीम प्रबंधन बना कारण।
Web Summary : क्रिस वोक्स ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट से संन्यास लिया। भारत के खिलाफ एक मैच में चोट और उसके बाद टीम प्रबंधन के फैसलों ने उनके फैसले को प्रभावित किया। विश्व कप जीत में योगदान के बावजूद, उन्हें अपना भविष्य अनिश्चित लगा।
Web Title : Chris Woakes retires: Brave act, team management led to decision.
Web Summary : Chris Woakes retired from international cricket. An injury during a match against India and subsequent team management decisions influenced his choice. Despite his courageous display and contributions to World Cup wins, he felt his future was uncertain.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.