ENG vs IND : इंग्लंडचे कपडे पांढरे शुभ्र आणि आपले ऑफ व्हाईट का? जाणून घ्या यामागची रंजक गोष्ट

फिल्डवर एकाच रंगातील दोन छटा; जाणून घ्या त्यामागची खास गोष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 19:08 IST2025-06-23T19:03:50+5:302025-06-23T19:08:52+5:30

whatsapp join usJoin us
Why Are England's Clothes White And Team India Use Off White Colours Test jersey Know Interesting Story Behind This | ENG vs IND : इंग्लंडचे कपडे पांढरे शुभ्र आणि आपले ऑफ व्हाईट का? जाणून घ्या यामागची रंजक गोष्ट

ENG vs IND : इंग्लंडचे कपडे पांढरे शुभ्र आणि आपले ऑफ व्हाईट का? जाणून घ्या यामागची रंजक गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातून इंग्लंड-भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.   अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसह भारतीय कसोटी क्रिकेटमधील नव्या पर्वाची सुरुवात झालीये. इंग्लंडच्या खेळपट्टीवर खास नजराणा पेश करणं हे नेहमीच आव्हानात्मक असते. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं पहिल्याच सामन्यात धमक दाखवलीये. इंग्लंड-भारत यांच्यातील कसोटी सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीशिवाय आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरणारी ही  ती म्हणजे दोन्ही संघातील खेळाडूंच्या कपड्यांमधील रंगातील फरक.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

फिल्डवर एकाच रंगातील दोन छटा 

लाल चेंडू अन् पांढऱ्या रंगातील कपडे ही कसोटी क्रिकेटची परंपराच आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात त्याची झलक दिसते. पण दोन्ही संघातील पांढऱ्या रंगात वेगळेपणही अगदी सहज जाणवते. इंग्लंडच्या मैदानात उतरलेल्या टीम इंडियातील खेळाडूंच्या जर्सीचा रंग हा यजमानांच्या तुलनेत अगदीच फिका वाटतो. फिल्डवरील एकाच रंगातील दोन छटा दिसण्यामागचं नेमकं कारण काय? इथं जाणून घेऊयात यासंदर्भातील रंजक गोष्ट

कसोटीत ९९ धावांवर विकेट्स गमावणारे फलंदाज, ब्रूकसोबत या यादीत पंत अन् MS धोनीचंही नाव

यजमान असल्यामुळे इंग्लंडचा संघ पांढऱ्या शुभ्र कपड्यात वावरतोय?

ICC नियमानुसार, कसोटीत यजमान संघ आणि पाहुणा संघ दोन्ही संघातील कपड्यांमधील रंग छटा वेगळी असावी, असा ठाम नियम नाही. पण कसोटीतील अलिखित परंपरेनुसार, इंग्लंडच्या संघाने पारंपारिक पांढऱ्या शुभ्र रंगाला पसंती दिल्याचे दिसून येते. दुसरीकडे पाहुण्या संघातील खेळाडू वेगळी छटा असणाऱ्या कपड्यांसह वावरतात. यात ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलरचा समावेश असू शकतो. भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर ऑफ व्हाईट रंगाच्या जर्सीला पसंती दिल्याचे दिसून येते.

टेस्टमधील कपड्यांतील रंगाच्या खेळात ब्रॉडकास्टर्स अन् वातावरण यांचही ट्विस्ट

यजमान इंग्लंड संघातील खेळाडूंचे कपडे शुभ्र पांढऱ्या रंगातील आहेत. दुसरीकडे भारतीय संघ ऑफ व्हाईट कपड्यांसह मैदानात उतरला आहे. टेलिव्हिजनवर सामना पाहताना यजमान संघाचे कपडे अधिक उजळ दिसण्यात इंग्लंडमधील वातावरणासह ब्रॉडकास्टर्सचाही रोल आहे. ब्रॉडकास्टर्सकडून यजमान संघावर खास फोकस करण्यासाठी खास कलर टोनही सेट केला जातो. एवढेच नाही तर इंग्लंडमधील हिरव्यागार मैदानातील ढगाळ वातावरणामुळे इंग्लंड संघाचे पांढऱे शुभ्र कपडे अधिक चमकदार दिसतात.

किट स्पॉन्सर्स अन् फॅब्रिक शेड्स

इंग्लंडच्या संघाचा किट स्पॉन्सर Adidas आहे. त्यांच्या किटमध्ये शुभ्र पांढऱ्या रंगाला पसंती दिली जाते. इंग्लंडच्या वातावरणासाठीही हा रंग एकदम योग्य आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा किट स्पॉन्सर Killer आहे. भारतीय वातावरणात इंग्लंडसारखे शुभ्र पांढरे कपडे  खराब होतात. त्यामुळे भारतीय संघाच्या कसोटी किट ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलरला पसंती दिली जाते. हे देखील कसोटी मधील पांढऱ्या कपड्यांमधील वेगळेपण जपण्याचं एक कारण आहे.
 

 

Web Title: Why Are England's Clothes White And Team India Use Off White Colours Test jersey Know Interesting Story Behind This

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.