- अयाज मेमन
(कन्सल्टिंग एडिटर)
तसे पाहिले तर हा थोड्या अंतराने असलेला पराभव. पण तो पराभवच. शनिवारी ॲडिलेड येथे दुसऱ्या
डावात असे नेमके काय घडले,
ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा
धक्का बसला? भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजी इतकी कोलमडून जाईल, असे कुणाला वाटलेही नसेल. 
हा एक कटू अनुभव होता. भारतीय संघाने जेव्हा खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा भारत विजय नोंदवणार, असे चित्र होते. मात्र, काही तासांच्या या लढ्यात भारतीय फलंदाजी कोलमडली. उपाहारानंतरच्या एका तासातच होत्याचे नव्हते झाले. ऑस्ट्रेलियाने दोन दिवसात हा सामना जिंकला. 
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हणतात; पण एवढी अनिश्चितता कोण सहन करणार? हे संकट कोण झेलू शकतो? टीव्हीवरही असा अनुभव पाहताना वेगळेच वाटले. मध्यक्रमात फलंदाजांना खेळपट्टीवर खेळताना दबावाचा सामना करताना पाहण्यात आले. 
असे वाटत होते की, ते मैदानावर वेळ द्यायला आलेच नाहीत. जो तो आल्यानंतर परत जात होता. कोहली बाद झाल्यानंतर तर लोक निराशेने आपल्या भावना प्रगट करीत होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताचेच हे सर्वात खराब प्रदर्शन होते, असे नाही. याआधीही इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड संघ एका डावात केवळ २६ धावांवर बाद झाला होता.
भारताचा हा फ्लॉप शो कशामुळे ? 
१) विदेशी भूमीवर खेळण्यात अडचणी
२) दिवस-रात्र गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव कमीच
३) प्रथम श्रेणी सामने नसल्याने दाैऱ्याचा अभ्यास नाही
४) पहिल्या ११ खेळाडूंची खराब निवड
५) तुलनेत, ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची छाप 
६) अतिआत्मविश्वासामुळेही नुकसान
- मी पूर्णपणे आशावादी आहे. मी सकारात्मकरीत्या पाहताेय. उर्वरित कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करतील. मात्र, हा पराभव प्रभाव पाडू शकतो. 
-  कारण पुढे कोहली उपलब्ध नसेल तसेच जडेजा, शमी हे दुखापतग्रस्त आहेत. पृथ्वी शॉ ने पूर्णपणे निराश केले आहे. त्यामुळे खेळाडूंची निवडही कोड्यात टाकणारी आहे.