"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत

रिक्षावाल्याचा मुलगा असो वा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा....नेमकं काय म्हणाला सिराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:57 IST2025-06-12T14:45:28+5:302025-06-12T14:57:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Who Thought A Son Of An Auto Driver Will Play For The Team India Mohammed Siraj Recalls Late Father And Insulting Trolls | "जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत

"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत

Mohammed Siraj Viral Post : भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या मोहम्मद सिराजनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केलेली भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हैदराबादच्या गल्लीपासून ते क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करताना त्याने आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

"तू वडिलांप्रमाणे रिक्षाच चालव"

सिराजनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी प्रत्येक दिवशी कृतज्ञता बाळगतो. एका रिक्षा चालकाचा मुलगा भारतीय संघाकडून खेळेल याचा कुणी विचार केला होता का? ज्यावेळी एखादा लहान मुलगा मला भारतीय संघाकडून खेळायचं असं म्हणतो त्यावेळी मला अभिमान वाटतो. माझ्या प्रवासात मला काही असे लोकही भेटले जे मला टोमणा मारायचे. ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानात माझ्याकडून चांगली कामगिरी व्हायची नाही त्यावेळी काही जण मला म्हणायचे की, "जा अन्  तू वडिलांप्रमाणे रिक्षाच चालव." असा उल्लेख सिराजने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."

दिवंगत वडिलांबद्दलही व्यक्त केल्या मनातील भावना


माझ्या वडिलांचे काम हे अपमानित करणारे नव्हते. ते माझी ताकद होते. त्यांनी मला एकच गोष्ट शिकवली, ती म्हणजे कोण काय म्हणतं याकडे लक्ष न देता आपण आपल्या मार्गाने पुढे चालत राहायचं. ज्यावेळी माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यावेळी मी अधिक मेहनत घेतली. आज टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी हे वर्षांनुवर्षे केलल्या मेहनतीचे फळ आहे, असेही तो म्हणाला आहे.  

 या गोष्टीमुळं काही फरक नाही पडत की, ...

मोहम्मद सिराजनं पोस्टच्या अगदी शेवटी लिहिलंय की,  रिक्षावाल्याचा मुलगा असो वा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर काहीच फरक पडत नाही.  यश हे नाव आणि पत्ता विचारत नसते. त्यासाठी आवश्यक असते  ती मेहनत. माझी कॅप अन् टीम इंडियाची जर्सी हा त्याचाच एक पुरावा आहे. 

Web Title: Who Thought A Son Of An Auto Driver Will Play For The Team India Mohammed Siraj Recalls Late Father And Insulting Trolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.