Join us

भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत तरी कोण, आता तिघांमध्येच चुरस

निवड समितीने मात्र या प्रत्येक पदासाठी तीन जणांची निवड केली आहे. आता या तीन जणांमध्येच चुरस असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 21:22 IST

Open in App

मुंबई : भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. पण अजूनपर्यंत सहाय्यक प्रशिक्षकांची निवड करण्यात आलेली नाही. पण बीसीसीआयच्या निवड समितीने मात्र या प्रत्येक पदासाठी तीन जणांची निवड केली आहे. आता या तीन जणांमध्येच चुरस असेल.

फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी संजय बांगर, विक्रम राठोड आणि मार्क रामप्रकाश यांच्यांमध्ये आता स्पर्धा असेल. गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी भारत अरुण, पारस म्हाब्रे आणि वेंकटेश प्रसाद यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, अभय शर्मा आणि टी. दिलीप यांच्यांमधून निवडण्यात येईल.

टॅग्स :बीसीसीआयरवी शास्त्री