Join us

विराट-अनुष्काला लंडनमध्ये कोण भेटला?, सोशल मीडियावर चर्चा

भारतीय क्रिकेट संघाने नॉटिंगहॅम कसोटी जिंकून इंग्लंडविरूद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान 1-2 असे कायम राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 17:11 IST

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाने नॉटिंगहॅम कसोटी जिंकून इंग्लंडविरूद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान 1-2 असे कायम राखले आहे. कर्णधार विराट कोहलीने 2014च्या इंग्लंड दौऱ्यातील अपयश मागे सोडून यंदा येथे खोऱ्याने धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तोपर्यंत भारतीय संघ कुटुंबीयांबरोबर वेळ घालवत आहेत.इंग्लंड दौऱ्याला सुरूवात झाल्यापासून विराटची पत्नी अनुष्का शर्मा लंडनमध्ये आहे. पती विराटला चिअर करण्यासाठी ती स्टेडियमवरही उपस्थित राहत आहे. विश्रांतीचा दिवस असल्याने या जोडीने शनिवारी लंडनमध्ये भटकंती केली. तेव्हा त्यांना एका मॉलमध्ये एक पाहुणा भेटला आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह ते आवरू शकले नाही. विराटने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारत विरुद्ध इंग्लंडक्रीडा