Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Hazare Trophy: कोण आहे Vishvaraj Jadeja? ज्याच्या पॉवरच्या जोरावर सौराष्ट्र संघानं गाठली फायनल

आता विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेची फायनल रंगल्याचे पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 10:23 IST

Open in App

Vishvaraj Jadeja's Heroics Propel Saurashtra Beats Punjab Enter Final Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विश्वराज जडेजाच्या अविश्वसनिय आणि ऐतिहासिक खेळीच्या जोरावर सौराष्ट्रच्या संघाने पंजाबनं दिलेल्या धावांचा अगदी सहज पाठलाग करत फायनल गाठली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगच्या अर्धशतकासह अनमोलप्रीत कौरच्या शतकी खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघाने निर्धारित ५० षटकात २९१ धावा करत सौराष्ट्र संघासमोर २९२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्र संघाच्या टॉप ऑर्डरमधील तिघांनी ३९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ९ विकेट्स राखून संघाला विजय मिळवून दिला. आता विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेची फायनल रंगल्याचे पाहायला मिळणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सौराष्ट्र संघाच्या सलामी जोडीचा धमाकेदार रिप्लाय, कर्णधार बाद झाल्यावर जडेजाला प्रेरक मंकडनं दिली साथ   

पंजाबच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार आणि विकेट किपर बॅटर हार्विक देसाई आणि विश्वराज जडेजा या जोडीनं सौराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी रचत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडले. कर्णधार हार्विक देसाई ६३ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ६४ धावा करून बाद झाला. त्यानंतर विश्वराज आणि प्रेरक मंकड जोडी जमली.  विश्वराजनं  १२७ चेंडूत १८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १६५ धावांची नाबाद खेळी साकारली. दुसऱ्या बाजूला प्रेरक ४९ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने ५३ धावांवर नाबाद राहिला.

T20 Cricket Record : डेविड वॉर्नरची कमाल! सेंच्युरीसह किंग कोहलीला टाकले मागे

पंजाबची गोलंदाजी ठरली फुसका बार 

गोलंदाजीत पंजाबच्या संघाकडून गुरनूर ब्रारनं एकमेव विकेट मिळवली. पण यासाठी त्याने ७ षटकात ५२ धावा खर्च केल्या. अन्य एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. परिणामी सेमीफायनलमध्ये पंजाबच्या संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

विदर्भ आणि सौराष्ट्र  यांच्यात रंगणार फायनल

याआधी पहिल्या सेमीफायनलमध्ये गत उपविजेत्या विदर्भ संघाने गत विजेत्या कर्नाटकला बाहेरचा रस्ता दाखवत फायनलचे तिकीट मिळवले होते. दुसऱ्या फायनलिस्टच्या रुपात सौराष्ट्र संघ त्यांना चॅलेंज देताना दिसेल.  रविवारी बीसीसीआय ऑफ एक्सलेन्सच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे.

कोण आहे विश्वराज जडेजा?

१९ जुलै १९९८ रोजी राजकोट येथे जन्मलेला विश्वराज हा २०१८ च्या अखेरीस प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सौराष्ट्र संघात आपला स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. तंत्रशुद्ध फलंदाजीसह मॉडर्न जमान्यातील आक्रमकता असे कमालीचे मिश्रण त्याच्या खेळीत पाहायला मिळते.  उजव्या हाताचा फलंदाज सौराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात करतो. सलामीवीराच्या रुपात सातत्यपूर्ण कामगिरीसह त्याने आपल्यातील धमक दाखवली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Vishvaraj Jadeja's century propels Saurashtra to Vijay Hazare Trophy final.

Web Summary : Vishvaraj Jadeja's unbeaten 165 led Saurashtra to a dominant Vijay Hazare Trophy semi-final win against Punjab. Saurashtra chased down 292 with ease, thanks to Jadeja and Mankad's partnership, securing a final berth against Vidarbha. Jadeja's consistent performance strengthens Saurashtra's batting lineup.
टॅग्स :विजय हजारे करंडकबीसीसीआय