Who Is Uttarakhand Pacer Devendra Bora Dismissed Rohit Sharma For A Golden Duck : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दीडशतकी खेळी करणारा रोहित शर्मा उत्तराखंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला. जयपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात उत्तराखंडच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज देवेंद्र बोरा याच्या चेंडूवर रोहित शर्मानं फेव्हरेट पुल शॉट खेळला अन् तो झेलबाद होऊन परतला. अगदी सीमारेषेच्या जवळ जगमोहन नागरकोटी याने कोणतीही चूक न करता रोहितचा झेल टिपला. इथं जाणून घेऊयात कोण आहे. देवेंद्र बोरा ज्याच्यासमोर हिटमॅन रोहितवर गोल्डन डकची नामुष्की ओढावली त्यासंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहे देवेंद्र बोरा? ज्याच्यासमोर हिटमॅन ठरला फ्लॉप
२५ वर्षीय देवेंद्र सिंह बोरा हा उजव्या हाताने मध्यम जलदगी करणारा गोलंदाज आहे. डेबू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पठ्ठ्यानं स्थानिक उत्तराखंड लीगमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. २०२५ च्या हंगामातील UPL T20 लीगमध्ये त्याने देहरादूनच्या संघाकडून खेळताना आपल्या गोलंदाजीची खास झलक दाखवून दिली होती. स्लोव्हर डिलिव्हरी आणि कटर ही त्याच्या गोलंदाजीतील खासियत असून तो मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देण्यात माहिर असणारा गोलंदाज आहे.
Vijay Hazare Trophy सामन्यादरम्यान रोहित शर्माला चक्क वडापावची ऑफर; त्यावर हिटमॅनची मजेशीर रिअॅक्शन (VIDEO)
लिस्ट ए क्रिकेटमधील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या रुपात पाचवी शिकार
देवेंद्र सिंह बोरा त्याच्या कारकिर्दीतील फक्त तिसऱ्या लिस्ट ए सामन्यात खेळत आहे. या फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या रुपात त्याने पाचवी विकेट घेतली. ही विकेट या युवा गोलंदाजाचा आत्मविश्वास कमालीची उंचावणारी अशीच आहे. २०२४ मध्ये फक्त एक लिस्ट ए सामना खेळणाऱ्या देवेंद्रनं यंदाच्या हंगामातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील हिमाचल प्रदेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ४४ धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात १५ सामन्यात ३० विकेट्स जमा आहेत.