Who Is Prashant Veer? Uttar Pradesh Spinner Allrounder Most Expensive Uncapped Player In IPL History : आयपीएलच्या मिनी लिलावात एका बाजूला भारताच्या स्टार खेळाडूंना असोल्डचा टॅग लागला असताना अनकॅप्ड भारतीय युवा खेळाडूंची चांदी झाल्याचे पाहायला मिळाले. यूपीच्या स्थानिक लीगमध्ये अष्टपैलू कामगिरी करून लक्षवेधून घेणाऱ्या प्रवीण वीरसाठी लिलावात विक्रमी बोली लागल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ३० लाख मूळ किंमत असलेल्या फिरकी अष्टपैलू खेळाडूसाठी तब्बल १४ कोटी २० लाख रुपये मोजले. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनकॅप्ड खेळाडूवर लागलेली ही सर्वोत मोठी बोली ठरली. पण तुम्हाला माहितीये का? २० वर्षीय क्रिकेटर एका बोलीवर करोडपती झाला असला तरी त्यामागे मोठी मेहनत आहे. प्रशांत वीर हा वयाच्या १४ व्या वर्षांपासून सहारनपूर क्रिकेट अकादमीत सराव करतो. देशांतर्गत क्रिकेट आणि स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्यातील अष्टपैलूत्वाची धमक दाखवून दिली. युवीला आदर्श मानणाऱ्या या क्रिकेटरनं MS धोनीसोबत खेळण्याचं स्पप्न पाहिलं होते. ते आगामी हंगामात सत्यात उतरणार आहे.
कोण आहे प्रशांत वीर?
प्रशांत वीर हा डावखुऱ्या हाताने मोठी फटकेबाजी करण्यासोबत डावखुऱ्या हाताने प्रभावी फिरकी गोलंदाजी करण्यात माहीर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशचे प्रतिनीधीत्व करतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत उत्तर प्रदेश कडून खेळताना त्याने दमदार कामगिरी करून दाखवली होती. याशिवाय उत्तर प्रदेश टी-२० लीग २०२५ स्पर्धेत त्याने १० डावात ३२० धावांसह ८ विकेट्स घेत लक्षवेधी कामगिरी केली होती.
एमएस धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहिल अन्...
प्रशांत वीर याने एका मुलाखतीमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. धोनीसोबत कमीत कमी एक हंगाम खेळायचं स्वप्न पाहतोय असे तो म्हणाला होता. अखेर त्याचं हे स्वप्न साकार झाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी संघाने मूळ किंमतीपेक्षा ४७ पट्टीने अधिक रक्कम मोजून त्याचं हे स्वप्न साकार करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आहे असे तो म्हणाला होता.