कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?

 आधी जलदगती गोलंदाजी करायचा; धोनीचा प्रभाव अन् विकेट किपर बॅटरच्या रुपात सोडली छाप

By सुशांत जाधव | Updated: April 10, 2026 01:08 IST2026-04-10T01:05:47+5:302026-04-10T01:08:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Who is Mukul Choudhary? 21-year-old LSG WK Batsman MS Dhoni connection And Crickete Journy Turn Into Medium Fast Bowler To Big Six Hitter And Best Finisher | कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?

कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?

IPL 2026 KKR vs LSG Who is Mukul Choudhary : कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर IPL 2026 मध्ये नव्या ‘बिग हिटर’ची झलक पाहायला मिळाली. Mukul Choudhary या २१ वर्षीय तरुणाने KKR विरुद्ध झुकलेला सामना एकहाती फिरवत लखनौ सुपर जाएंट्सला सलग दुसरा विजय मिळवून दिला. राजस्थानमधील झुनझुनू (Jhunjhunu) या सैनिकांच्या जिल्ह्यातून आलेल्या या पठ्ठ्याने आपल्या तिसऱ्याच सामन्यात अर्धशतक झळकावत सगळ्यांचं लक्ष वेधलं. जिथं प्रत्येक तरुणाचं स्वप्न आर्मीमध्ये जाण्याचं असतं, तिथं क्रिकेटच्या मैदानातील बिग हिटर कसा घडला? त्यासंदर्भातील स्टोरी एकदमच खास आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मिनी लिलावात युवा बिग हिटरला संघात घेण्यासाठी MI आणि LSG  यांच्यात रंगलेला सामना 


टी-२० क्रिकेटमधील अल्प अनुभव असलेल्या या युवा खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी मिनी लिलावात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात तगडी फाईट झाली होती. लखनौच्या संघाने २ कोटी ६० लाख रुपये घेत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.  वडिलांच स्वप्न साकार करण्यासाठी क्रिकेटरच्या रुपात घडलो, असे त्याने कोलकाता नाईटर रायडर्स विरुद्धच्या कडक खेळीनंतर सांगितले. 

अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच

 वडिलांचं स्वप्न अन् तो क्रिकेटरच्या रुपात घडला   

कोलकाता विरुद्धच्या सामन्यातील कडक आणि मॅच विनिंग अर्धशतकी खेळीनंतर मुकुल चौधरीनं आपल्या क्रिकेटच्या प्रवासासंदर्भात काही खास गोष्टी शेअर केल्या.  राजस्थानमधील झुनझुनू येथील बहुतांश तरुण आर्मी मॅन होण्याचं स्वप्न पाहातात. मग तू क्रिकेटकडे कसा वळलास? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, माझा जन्म होण्याआधीच वडिलांनी मला क्रिकेटरच्या रुपात घडवण्याचं स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे क्रिकेटचा प्रवास १२-१३ व्या वर्षी सुरु झाला.  

 असा सुरु झाला क्रिकेटच्या रुपात घडण्याचा प्रवास

मुकुल चौधरीचे वडील दिलीप कुमार चौधरी यांची त्याच्या प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सुरुवातीच्या काळात शिक्षकाच्या रुपात काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी रिअल इस्टेट व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात स्थिर झाल्यावर मुकुलला क्रिकेटचं उत्तम प्रशिक्षण मिळावे यासाठी सिकर येथील SBS क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. त्यानंतर मुकुलने जयपूरमधील अरावली क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवले. 

 जलदगती गोलंदाजी करायचा; धोनीचा प्रभाव अन् विकेट किपर बॅटरच्या रुपात सोडली छाप

मुकुल चौधरी याने मध्यम जलदगती गोलंदाजाच्या रुपात आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. एका सामन्यात संघाच्या गरजेनुसार त्याने विकेट किपिंग केली आणि हीच भूमिका स्वीकारली. MS धोनीकडून प्रेरणा घेत त्याने बिग हिटरच्या रुपात आपली खास छाप सोडली.  गत वर्षी २३ वर्षांखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत त्याने १०३ च्या सरासरीसह १४२ च्या स्ट्राईक रेटनं  ६६७ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.  या स्पर्धेत सलग शतकांसह त्याने सर्वाधिक ३४ षटकार ठोकले होते. याच स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याची राजस्थानच्या संघात निवड झाली.  २०२५-२६ च्या  हंगामात त्याने ५ सामन्यांत १९९ च्या स्ट्राईक रेटनं १७३ धावा करत फिनिशरच्या रुपात सर्वोत्तम खेळाडू असल्याची झलक दाखवली होती. 
 

Web Title : मुकुल चौधरी: आर्मी के सपने से IPL के बड़े हिटर तक का सफर।

Web Summary : राजस्थान के 21 वर्षीय मुकुल चौधरी ने IPL 2026 में लखनऊ के लिए शानदार जीत हासिल की। बोली युद्ध के बाद टीम में शामिल, चौधरी ने अपने पिता का क्रिकेट का सपना पूरा किया, धोनी से प्रेरित होकर विकेट-कीपर बल्लेबाज के रूप में उत्कृष्ट प्रदर्शन किया।

Web Title : Mukul Choudhary: From Army dream to IPL big-hitting hero.

Web Summary : Mukul Choudhary, a 21-year-old from Rajasthan, shone in IPL 2026, securing a win for Lucknow. Drafted after a fierce bidding war, Choudhary fulfilled his father's cricketing dream, excelling as a wicket-keeper batter inspired by Dhoni.