कोण आहे David Payne? इंज्युरी रिप्लेसमेंटच्या रुपात काव्या मारनच्या SRH नं लावला कोट्यवधीचा डाव

IPL च्या हंगामाला सुरुवात होण्याआधी SRH नं खेळलेला डाव संघासाठी कितपत उपयुक्त ठरणार ते पाहण्याजोगे असेल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:12 IST2026-03-24T15:09:07+5:302026-03-24T15:12:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Who Is David Payne English Pacer Signed By Kavya Maran Owned Franchise SRH as Jack Edwards Replacement | कोण आहे David Payne? इंज्युरी रिप्लेसमेंटच्या रुपात काव्या मारनच्या SRH नं लावला कोट्यवधीचा डाव

कोण आहे David Payne? इंज्युरी रिप्लेसमेंटच्या रुपात काव्या मारनच्या SRH नं लावला कोट्यवधीचा डाव

IPL २०२६ च्या १९ व्या हंगामाआधी अनेक फ्रँचायझी संघांना धक्क्यावर धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. दुखापतीमुळे काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली असून काही खेळाडू उशीराने आपल्या संघांना जॉईन करणार आहेत. काव्या  मारनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादच्या संघ यंदाच्या हंगामाची सुरुवात नव्या कर्णधारासह करणार आहे. पॅट कमिन्स दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांना मुकणार असल्यामुळे ईशान किशनकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. आता संघाने दुखापतीमुळे IPL मधून माघार घेतलेल्या जॅक एडवर्ड्सच्या जागी नव्या भिडूची निवड केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

SRH नं बदली खेळाडूसंदर्भात घेतला मोठा निर्णय

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन जॅक एडवर्ड्सला ३ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते. पण तो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. आता इंज्युरी रिप्लेसमेंटच्या रुपात काव्या  मारनच्या SRH नं इंग्लंडच्या जलदगती गोलंदाज डेविड पेन (David Payne) याच्यावर कोट्यवधींचा डाव लावला आहे. १.५ कोटी रुपयांसह या गोलंदाजाला SRH संघाने करारबद्ध केले आहे.

Yash Dayal Out of IPL 2026 : गत चॅम्पियन RCB च्या गोलंदाजानं माघार घेतली; की त्याला बाहेर काढलं?

कोण आहे डेविड पेन? ज्यावर काव्या मारनच्या SRH नं लावला कोट्यवधीचा डाव

डेविड अ‍ॅलन पेन हा इंग्लंडचा डावखुरा मध्यम-जलदगती गोलंदाज आहे. त्याने २००९ मध्ये ग्लॉस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडच्या अंडर-19 संघाचे टेस्ट आणि वनडे या दोन्ही प्रकारांत प्रतिनिधित्व केले असून २०११० च्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठीही त्याची निवड झाली होती. ३५ वर्षीय पेनने इंग्लंडसाठी एक वनडे सामना खेळला आहे. त्याच्याकडे टी २० क्रिकेटचा मोठा अनुभव असून २३३ टी २० सामन्यांत त्याच्या खात्यात एकूण ३०४ विकेट्स जमा आहेत.  २०२४ च्या टी२० ब्लास्टमध्ये १७ डावांत ३३ बळी घेत अव्वल स्थान पटकावले होते आणि 'द हंड्रेड'मध्ये वेल्श फायरचे प्रतिनिधित्वही केले आहे. हा गोलंदाज बीबीएलसह विविध लीगमध्ये फ्रँचायझीचा अनुभव मिळवला आहे, जिथे त्याने पर्थ स्कॉचर्ससोबत विजेतेपद पटकावले. IPL च्या हंगामाला सुरुवात होण्याआधी SRH नं खेळलेला डाव संघासाठी कितपत उपयुक्त ठरणार ते पाहण्याजोगे असेल. 

Web Title : SRH ने चोटिल एडवर्ड्स की जगह डेविड पेन को आईपीएल 2026 के लिए साइन किया

Web Summary : सनराइजर्स हैदराबाद ने चोटिल जैक एडवर्ड्स की जगह इंग्लैंड के डेविड पेन को 1.5 करोड़ में साइन किया। पेन, एक बाएं हाथ के तेज गेंदबाज हैं जिनके पास टी20 का विशाल अनुभव है, और उन्होंने पर्थ स्कॉर्चर्स के साथ एक खिताब जीता है। SRH को उम्मीद है कि इस कदम से उनकी टीम मजबूत होगी।

Web Title : SRH replaces injured Edwards with England's David Payne for IPL 2026

Web Summary : Sunrisers Hyderabad signed England's David Payne for 1.5 crore, replacing injured Jack Edwards. Payne, a left-arm pacer with vast T20 experience, has played in various leagues and won a title with Perth Scorchers. SRH hopes this move strengthens their squad.