Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Hazare Trophy : विदर्भ संघाचा 'बाहुबली'! अमन मोखाडेनं केली विश्वविक्रमाची बरोबरी

भारताकडून सर्वात जलद १००० धावा, वर्ल्ड रेकॉर्डचीही केली बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 14:35 IST

Open in App

Vijay Hazare Trophy Vidarbha Aman Mokhade Equaling The World Record : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या २०२५-२६ च्या पहिल्या सेमीफायनलमधील विजयासह विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा या प्रतिष्ठित स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. गत हंगामात ज्या संघाने पराभवाचा दणका दिला त्या कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात अमन मोखाडेच्या शतकी खेळीच्या जोरावर विदर्भ संघाचा फायनलचा मार्ग मोकळा झाला. कर्नाटकच्या संघाने दिलेल्या २८१ धावांचा पाठलाग करताना मोखाडेनं १२२ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने  १३८ धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर तो सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमध्ये या विदर्भकराने जागतिक विक्रमाची बरोबरी साधली आहे.

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारताकडून सर्वात जलद १००० धावा, वर्ल्ड रेकॉर्डचीही केली बरोबरी

कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात अमन मोखाडे याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १००० धावांचा पल्ला गाठला. अवघ्या १६ डावात हजार धावांचा पल्ला गाठत विदर्भकरानं देवदत्त पडिक्कल आणि अभिनव मुकुंद यांना मागे टाकले.  एवढेच नाही तर जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे. देवदत्त आणि मुकुंद या दोघांनी १७ डावात ए लिस्टमध्ये १००० धावांचा पल्ला गाठला होता. अमन मोखाडे भारताकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावा करणारा बॅटर ठरला आहे. याशिवाय त्याने दक्षिणआफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज ग्रेम पॉलक यांच्या जागतिक विक्रमाचीही बरोबरी केली. ग्रेम पॉलक याने देखील १६ डावात लिस्ट ए क्रिकेटमध्ये हजार धावा केल्या होत्या.

Vijay Hazare Trophy: 'तो' ३६ चा आकडा! अमनच्या सेंच्युरीसह विदर्भकरांनी फायनल गाठत घेतला कर्नाटकचा बदला

कोण आहे अमन मोखाडे?

अमन मोखाडेचा जन्म १६ जानेवारी २००१ रोजी झाला. त्याने प्रसिद्ध प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेतले आहेत. हेच ज्वाला सिंग भारतीय संघाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल यांचेही प्रशिक्षक आहेत. टॉप-ऑर्डर फलंदाज असलेल्या अमनकडे लेग ब्रेक फिरकी टाकण्याचीही क्षमता आहे. २४ वर्षीय खेळाडू सध्या सर्वच फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत आहे. २०२२-२३ हंगामात पदार्पणापासून तो सातत्याने चर्चेत आहे. २०२५-२६ रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याने ७ डावांत ९६.१६ च्या सरासरीने  ३ शतके आणि १ अर्धशतकाच्या जोरावर ५७७ धावा केल्या आहेत. २०२५-२६ च्या हंगामातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तो विदर्भ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Aman Mokhade's Century Equals World Record in Vijay Hazare Trophy!

Web Summary : Aman Mokhade's century propelled Vidarbha into the Vijay Hazare Trophy final, avenging their previous loss to Karnataka. Mokhade's rapid 138 helped equal a world record for fastest 1000 List A runs by an Indian, matching Graeme Pollock's feat. He's trained by Jwala Singh, coach of Yashasvi Jaiswal.
टॅग्स :विजय हजारे करंडक