सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकत नवा इतिहास रचला. न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावल्यावर खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. भारतीय संघातील खेळाडूंनी मोठ्या आणि दिमाखदार विजयानंतर जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर एकच जल्लोष केला. फायनल जिंकल्यावर ईशान किशन कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडियासोबत विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ईशान किशनला चीअर करताना दिसली
न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये ईशान किशनचा शानदार शो पाहायला मिळाला. त्याने वादळी अर्धशतकीसह टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ईशानच्या या खेळीला स्टँडमध्ये बसून त्याची गर्लफ्रेंड अदिती चीअर करताना दिसली. मॉडेल आणि माजी ब्युटी क्वीन असलेली अदिती स्टेडियममध्ये भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांसोबत बसली होती. लाल रंगाचा टॉप परिधान करुन स्टायलिश लूकसह ईशानला दाद देतानाची तिची झळक कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पाहायला मिळाले.
भरमैदानात KISS, मग मांडीवर बसली...; Hardik Pandya - Mahieka Sharma चं 'खुल्लम खुल्ला प्यार'
मग विजयी जल्लोष अन् ईशान किशनला प्रेमाची मिठी
भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या कर्णधारीची पत्नी देविशासह हार्दिक पांड्या आणि ईशान किशनची गर्लफ्रेंड्सनी मैदानात एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळाले. अदितीने सर्वप्रथम कर्णधार सूर्यकुमारसोबत विजयाचा आनंद साजरा केला. त्यानंतर तिने ईशान किशनसोबत जल्लोष केला. तिने स्टार क्रिकेटरला मारलेली प्रेमाची मिठी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कोण आहे अदिती?
अदिती अदिती हुंडिया मूळची जयपूरची आहे. २०१७ मध्ये ती फेमिना मिस इंडिया (Femina Miss India 2017) सौंदर्य स्पर्धेतील फायनलिस्ट होती, तर २०१८ मध्ये तिने मिस दिवा २०१८ Miss Diva 2018 हा किताब जिंकला. अदिती ही एक उद्योजिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या रुपात आपली खास ओळख निर्माण केली आहे. अदिती चर्चेत कधी आली?
IPL स्पर्धेदरम्यान अनेकदा ईशानला चीअर करताना स्पॉट झाली अन्..
अदिती इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील २०१९ च्या हंगामात 'मिस्ट्री फॅन गर्ल'च्या रुपात चर्चेत आली होती. ईशान आणि अदिती २०१९ पासूनच एकमेकांसोबत डेट करत असल्याची चर्चाही रंगताना पाहायला मिळाली. दोघांनी अधिकृतरित्या नात्याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही. पण आता हे नात एकदम खास आहे ते जगजाहिर झाल्याचे दिसत आहे.
Web Summary : Ishan Kishan and rumored girlfriend Aditi Hundia celebrated India's T20 World Cup victory. Aditi, a former beauty queen, cheered Ishan during the final and later embraced him on the field, sparking viral buzz.
Web Summary : टी20 वर्ल्ड कप में भारत की जीत का जश्न ईशान किशन और अदिति हुंडिया ने मनाया। पूर्व ब्यूटी क्वीन अदिति ने ईशान को चीयर किया और मैदान पर गले लगाया, जो वायरल हो गया।