Join us

संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरला कुणी दुखावलं? का विचारावा लागला 'तो' प्रश्न?

Anaya Bangar viral video: संजय बांगरची मुलगा आर्यन काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करून मुलगी बनला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:23 IST

Open in App

Anaya Bangar viral video: भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर ( Sanjay Bangar) याचे नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. तो उत्तम समालोचक म्हणून भूमिका बजावतो. पण त्याच्या नावाची चर्चा होण्याचे कारण वेगळे आहे. संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर याने काही महिन्यांपूर्वी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीअंतर्गत आर्यन आता मुलगी झाली. तिने अनाया बांगर अशी नवीन ओळख मिळवली आहे. सध्या ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून नावारुपास येत आहे. पण मुलगा ते मुलगी या प्रवासात तिने क्रिकेट कधीच सोडले नाही. मुलगी झाल्यानंतरही तिने क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. असे असूनही, आता अनयाला कुणी दुखावलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामागचे कारणही खास आहे.

अनाया बांगरने का विचारला असा प्रश्न?

अनाया बांगर ही आधी मुलगा होती. तिला आर्यन बांगर म्हणून ओळखले जात असे. तो वडिलांप्रमाणे क्रिकेट खेळत असे. आर्यन बांगर हा अष्टपैलू खेळाडू होता. यूकेमध्ये हार्मोन प्रत्यारोपणानंतर आर्यन अनया झाली. या बदलानंतरही अनायाला क्रिकेटमध्ये रस होता. पण आता तिने एक व्हिडीओ पोस्ट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मी क्रिकेट खेळू की नको? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

अनया बांगरने इंस्टाग्रामवर पांढऱ्या कपड्यांमध्ये स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती एका अमेरिकन रॅपरच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या पोस्टसोबत तिने लोकांसाठी एक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावरून अनायाच्या मनात कोणत्या तरी विषयावरून घालमेल सुरू असल्याचे बोलले जात आहे. अनयाला ऑनलाइन ट्रोलिंगला सातत्याने सामोरे जावे लागले आहे. असे असतानाच क्रिकेटवर इतके प्रेम आहे, तरीही असा प्रश्न विचारण्यामागे ट्रोलिंग किंवा आणखी काही कारण आहे का, अशा चर्चांना वेग आला आहे.

टॅग्स :व्हायरल व्हिडिओट्रान्सजेंडर