Join us

... तर मोहम्मद शमीला होऊ शकते अटक

हसीनने केलेल्या आरोपामुळे शमी आता गोत्यात येऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 20:41 IST

Open in App
ठळक मुद्देशमीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा आरोप हसीनने केला होता.त्याचबरोबर मला दिलेला एक चेक बाऊन्स झाल्याचे सांगत हसीनने तक्रार केली होती. शमीला आज न्यायालयाने याबाबत नोटीस पाठवली आहे.

नवी दिल्ली : पत्नी हसीन जहाबरोबरचे प्रकरण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अडचणीत आणणारे ठरू शकते. कारण हसीनने केलेल्या आरोपामुळे शमी आता गोत्यात येऊ शकतो.

शमीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा आरोप हसीनने केला होता. त्याचबरोबर मला दिलेला एक चेक बाऊन्स झाल्याचे सांगत तिने तक्रार केली होती. शमीला आज न्यायालयाने याबाबत नोटीस पाठवली आहे. यानुसार शमी जर 15 जानेवारीला सुनावणीच्यावेळी उपस्थित राहीला नाही तर त्याच्याविरोधात अटक वॉरेंट काढण्यात येऊ शकते.

हसीनाने काय आरोप केले होतेएका पाकिस्तानी मुलीसोबत शमीचे अफेअर असून विविध मुलींसोबत ओळख वाढणे आणि त्यांच्याशी संबंध ठेवणे अशा कृत्यात शमी गुंतला असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर हसीनने शामीवर आणखी एक आरोप केला होता. एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हसीनने शमीवर तिच्या हत्येचा कट आणि मॅच फिक्सिंगचा सनसनाटी आरोप केला होता. माझा खून करून मृतदेह जंगलामध्ये दफन करून टाक असं शामी त्याच्या भावाला म्हणाला होता असा गंभीर आरोप हसीनने केला होता. त्याचबरोबर मला दिलेला एक चेक बाऊन्स झाला असून त्यासाठी शमीची तक्रार करणार असल्याचेही हसीनने सांगितले होते.

टॅग्स :मोहम्मद शामी