Join us

Snake in Irfan Pathan house : इरफान पठाणच्या घरी अनपेक्षित पाहुणा, 'साप' पाहून सर्वांची उडाली भंबेरी, Video

Snake in Irfan Pathan house : भारतीय संघाचे माजी खेळाडू इरफान पठाण व युसूफ पठाण यांच्या घरी सोमवारी अनपेक्षित पाहुण्याने भेट दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:35 IST

Open in App

Snake in Irfan Pathan house : भारतीय संघाचे माजी खेळाडू इरफान पठाण व युसूफ पठाण यांच्या घरी सोमवारी अनपेक्षित पाहुण्याने भेट दिली. पठाण कुटुंबियांच्या फार्म हाऊसवर साप आढळल्याने सुरुवातीला सर्वांची भंबेरी उडाली होती. त्वरित सर्प मित्राला बोलावण्यात आले आणि तो साप पकडला गेला. साप बिनविषारी असल्यामुळे पठाण बंधुंनी त्याच्यासोबत फोटोही काढले. 

इरफान व युसूफ या दोघांनी भारतीय क्रिकेटसाठी चांगले योगदान दिले आहे. युसूफनं भारताकडून ५७ वन डे व २२ ट्वेंटी-२० सामने खेळले. वन डे त त्यानं दोन शतकं व ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या. शिवाय ३३ विकेट्स घेतल्या.  इरफाननं २९ कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स घेतल्या. १२० वन डे व २४ ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे १५४४ धावा व १७३ विकेट्स आणि १७२ धावा व २८ विकेट्स आहेत.  

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :इरफान पठाणयुसुफ पठाणसाप
Open in App