Join us

IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर

BCCI, IPL 2025: बीसीसीआयने केवळ याच नव्हे तर IPL 2026, IPL 2027 च्या तारखाही आज घोषित केल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:20 IST

Open in App

BCCI, IPL 2025 Dates Announced: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु झाला. त्यात भारताचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. या सामन्यावर क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहेच. त्यासोबतच आगामी IPL साठी होणाऱ्या मेगा लिलावाकडेही भारतीय क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. याचदरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने IPLच्या आयोजनाबाबत मोठी घोषणा केली. BCCIने IPL च्या पुढील तीन वर्षांच्या तारखा आज जाहीर करून टाकल्या.

IPL 2025 कधी सुरु होणार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी काळातील IPL स्पर्धांच्या तारखा घोषित केल्या. त्यानुसार IPL 2025 हा हंगाम १४ मार्चपासून सुरु होईल आणि २५ मे रोजी संपेल. यासह बीसीसीआयने IPL 2026 आणि IPL 2027 या दोन हंगामाच्या तारखाही जाहीर केल्या. IPL 2026 चा हंगाम १५ मार्च ते ३१ मे दरम्यान खेळवला जाईल. तर IPL 2027 चा हंगाम १४ मार्च ते ३० मे या कालावधीदरम्यान खेळला जाईल.

BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा आधीच जाहीर करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे IPL ची वाढती लोकप्रियता आणि त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरवर होणारा परिणाम. भारतासह इतरही महत्वाच्या देशातील विदेशी खेळाडू IPL मध्ये खेळतात. अनेक संघ आपल्या द्विपक्षीय क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक देखील IPL च्या तारखांचा अंदाज घेऊन ठरवतात. त्यामुळे IPLच्या पुढील तीन वर्षांच्या तारखा BCCIने आताच जाहीर केल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२४आयपीएल लिलावबीसीसीआय