श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ कधी पोहोचणार; निर्माण झाली मोठी समस्या...

सध्याच्या घडीला आसाममध्ये जोरदार आंदोलनं सुरु आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 06:15 PM2020-01-02T18:15:26+5:302020-01-02T18:16:04+5:30

whatsapp join usJoin us
When will the Indian team arrive for the first Twenty20 match against Sri Lanka; The big problem was ... | श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ कधी पोहोचणार; निर्माण झाली मोठी समस्या...

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ कधी पोहोचणार; निर्माण झाली मोठी समस्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : या वर्षातील भारताचा पहिला सामना ५ जानेवारीला गुवाहाटीमध्ये होणार आहे. सध्याच्या घडीला आसाममध्ये जोरदार आंदोलनं सुरु आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण आता तर भारतीय संघ नेमका कधी पोहोचणार, हे कोणालाच माहिती नाही.

भारतीय संघ गुवाहाटीमध्ये कधी पोहोचणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण आसाम क्रिकेट संघटनेला भारतीय संघाच्या आगमनाबाबत काहीच माहिती नसल्याचे कळत आहे. कारण क्रिकेट संघटना आणि संघ व्यवस्थापन सांगत असलेल्या माहितीमध्ये एकवाक्यता नाही, हे समोर आले आहे.

आसाम क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष दत्ता यांनी सांगितले की, " रविवारी आमच्या स्टेडिममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी आसाममध्ये दाखल होणार आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे." 

दत्ता सांगत असले की, भारतीय संघ शुक्रवारी आसाममध्ये दाखल होणार आहे. पण संघ व्यवस्थापनामधील एका सदस्याने भारतीय संघ गुरुवारी रात्री आसाममध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारतीय संघ नेमका कधी दाखल होणार, याची उत्सुकता चाहत्यांना असले.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020 या नव्या वर्षातील दोन्ही संघांची ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी तगड्या खेळाडूंची फौज मैदानावर उतरवली आहे. टीम इंडियानं या दौऱ्यासाठी आधीच संघ जाहीर केला होता. त्यांना टक्कर देण्यासाठी श्रीलंकेनं बुधवारी संघ जाहीर केला. 16 सदस्यांच्या या संघात लंकेनं अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला संघात पुन्हा स्थान दिले आहे. दुखापतीमुळे ऑगस्ट 2018नंतर मॅथ्यूज लंकेच्या ट्वेंटी-20 संघात खेळलेला नाही. लसिथ मलिंगा या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

श्रीलंकेचा संघ - लसिथ मलिंगा ( कर्णधार), दानुष गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, कुसल पेरेरा, निरोशान डिकवेला, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्ष, ओशाडा फर्नांडो, वनिंदू हसरंगा, लाहीरु कुमारा, कुसल मेंडीस, लक्षण संदाकन, कसून रजिथा. 

टीम इंडिया - विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

 

 

वेळापत्रक
5 जानेवरी, भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला टी20 सामना(गुवाहाटी)
7 जानेवरी, भारत  विरुद्ध  श्रीलंका, दूसरा टी20 सामना(इंदूर)
9 जानेवरी, भारत  विरुद्ध श्रीलंका, तिसरा टी20 सामना (पुणे).

Web Title: When will the Indian team arrive for the first Twenty20 match against Sri Lanka; The big problem was ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.