Join us

वीरेंद्र सेहवाग जेव्हा भडकतो तेव्हा

एका पुस्तकातील एका वाक्यावरुन सेहवाग चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 18:30 IST

Open in App
ठळक मुद्देएका पाठ्यपुस्तकामध्ये एक वाक्य लिहिले गेले आहे आणि त्या वाक्यावरुन सेहवागचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला.

नवी दिल्ली : वीरेंद्र सेहवाग हा एक धडाकेबाज सलामीवीर होता. पण एक व्यक्ती म्हणून तो नेहमीच शांत असतो. बऱ्याचदा मजेशीर वक्तव्यही करतो. पण त्याला भडकलेला आपण पाहिला नसेल. पण एका पुस्तकातील एका वाक्यावरुन सेहवाग चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे.

एका पाठ्यपुस्तकामध्ये एक वाक्य लिहिले गेले आहे आणि त्या वाक्यावरुन सेहवागचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. या पाठ्यपुस्तकामध्ये लिहिले होते की, " एकत्रित कुटुंबपद्धतीमध्ये आई-बाबा, आजी-आजोबा आणि बरीच मुलं असतात. पण या एकत्रित कुटुंब आनंदीत नसतं. "

पाठ्यपुस्तकातील हे वाक्य वाचून सेहवाग चांगलाच खवळला. याने या गोष्टीवर जोरदार टीकाही केली आहे. सेहवाग याबाबत म्हणाला की, " पाठ्यपुस्तकांमध्ये सध्याच्या घडीला काहीही छापलं जात आहे. या गोष्टींचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पाठ्यपुस्तकांमध्ये काय छापायचं यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. "

सेहवागने काय ट्विट केलं ते पाहा

टॅग्स :विरेंद्र सेहवागक्रिकेट