जेव्हा कोहलीने गांगुली आणि सचिन यांना धुडकावलं होतं, बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांचा मोठा खुलासा

त्यामुळे आता गांगुली त्या गोष्टीचा बदला घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:21 PM2019-10-25T12:21:14+5:302019-10-25T12:21:42+5:30

whatsapp join usJoin us
When Virat Kohli threatens Sourav Ganguly and Sachin Tendulkar, former BCCI chief reveals | जेव्हा कोहलीने गांगुली आणि सचिन यांना धुडकावलं होतं, बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांचा मोठा खुलासा

जेव्हा कोहलीने गांगुली आणि सचिन यांना धुडकावलं होतं, बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांचा मोठा खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : दिवस कधीही सारखे नसतात, ते बदलवत असतात. त्यामुळे जेव्हा सुगीचे दिवस असतात तेव्हा पाय जमिनीवरच ठेवायचे असतात, नाही तर त्याचे परीणामही भोगावे लागतात. अशीच एक गोष्ट भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीत घडताना दिसत आहे. कोहलीने एकदा भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली व माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना धुडकावलं होतं. आता गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आहे. त्यामुळे आता गांगुली त्या गोष्टीचा बदला घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

काही वर्षांपूर्वी एक गोष्ट घडली होती. भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची निवड करायची होती. त्यावेळी बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समिची स्थापना केली होती. या समितीमध्ये सचिन आणि सौरव यांचा सहभाग होता. या समितीने प्रशिक्षपदी माजी कर्णधार अनिल कुंबळेची निवड केली होती. कुंबळेला एका वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. कुंबळेच्या काळात भारतीय संघाने चांगलीच प्रगती केली होती. त्यामुळे गांगुली आणि सचिन यांना कुंबळेकडे दुसऱ्या वर्षीही संघाचे प्रशिक्षकपद द्यायचे होते. पण गांगुली आणि सचिन यांचा प्रस्ताव कोहलीने धुडकावून लावला होता. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष विनोद रायन यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सौरव गांगुलीनं टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं रोहित शर्माकडे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका यजमानांनी 3-0 अशी जिंकली. या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशचा सामना करणार आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची निवड केली गेली. या बैठकीला बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली, निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. ट्वेंटी-20 साठी जाहीर केलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. 

भारतीय संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं विचार करत आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देऊन त्याची चाचपणी केली जाणार आहे. त्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंवर पडणारा ताणही लक्षात घेतला जाणार आहे. म्हणूनच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) करत होते. त्यामुळे या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.

भारताचा ट्वेंटी-20 संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर  

बांगलादेशचा ट्वेंटी-20 संघ - शकिब अल हसन ( कर्णधार), तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.

मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20,  दिल्ली
7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट
10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर

कसोटीत विराट कोहली खेळणार

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीच्या संघात विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. हा संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत. 

Web Title: When Virat Kohli threatens Sourav Ganguly and Sachin Tendulkar, former BCCI chief reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.