Join us

Old Video Viral : मुलीला आरती करताना पाहून भडकला शाहिद आफ्रिदी, तोडला घरातील टीव्ही

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:38 IST

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीका, जम्मू काश्मीर विरोधातील वादग्रस्त विधान, गौतम गंभीरसोबत उडणारे खटके, आदी अनेक कारणांनी आफ्रिदीला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. आता आफ्रिदीप्रती संताप व्यक्त करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आफ्रिदी स्वतः सांगतोय, की त्याच्या मुलीनं आरती केलेली त्याला आवडले नाही आणि त्या रागात त्यानं घरातला टीव्ही तोडला...

नीरज चोप्रा स्पष्टच बोलला, माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन 'Propaganda' चालवू नका!

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आफ्रिदीने एका मुलाखतीत खुलासा केला. तू कधी रागाच्या भरात घरातला टीव्ही तोडला आहेस का?, असा सवाल अँकरनं आफ्रिदीला विचारला. त्यावर तो म्हणाला, हो एकदा असे केले आहे. जेव्हा माझी मुलगी टीव्ही सीरियल पाहताना त्यात असलेल्या आरतीच्या दृश्याचे अनुकरण करत होती. तेव्हा मला राग आला ज्यामुळे मी टीव्ही तोडला.''

आफ्रिदी पुढे म्हणाला की, ''माझ्या पत्नीमुळे हे सर्व घडले. त्यावेळेस टीव्हीवर खूप मालिका सुरू होत्या. माझी पत्नी जास्त टीव्ही नाही पाहायची, परंतु तिला ती मालिका आवडायची. या मालिका मुलांसोबत बघू नकोस, असे मी तिला अनेकदा सांगितले होते. त्या मालिका पाहूनच मुलीनं आरतीचं अनुकरण केलं होतं. मालिकेत सुरू असलेल्या प्रसंगाप्रमाणे मुलगी ताट हातात घेऊन गोल गोल फिरवत होती. ते पाहून मला राग आला. ''   आफ्रिदीनं हा किस्सा सांगितल्यावर मुलाखतीच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्वांना टाळ्या वाजवल्या.. 

पाहा व्हिडीओ..  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान
Open in App