त्यानंतर सचिनविरुद्ध शेरेबाजी विसरलो- सकलेन

डावपेचानुसार पाक संघात नवखा असलेला सकलेन सचिनचे लक्ष विचलित करून त्याला बाद करण्यासाठी त्याच्याविरुद्ध काहीतरी बोलला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:12 IST2020-04-25T02:35:08+5:302020-04-25T07:12:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
When Saqlain Mushtaq sledged Sachin Tendulkar only to never sledge him again | त्यानंतर सचिनविरुद्ध शेरेबाजी विसरलो- सकलेन

त्यानंतर सचिनविरुद्ध शेरेबाजी विसरलो- सकलेन

नवी दिल्ली : सचिन आणि सकलेन मुश्ताक यांच्यात १९९०च्या दशकात अनेक रोमहर्षक प्रसंग घडले. एका सामन्यादरम्यान सकलेनने सचिनचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला; मात्र अशी काही अद्दल घडली की तेव्हापासून त्याने सचिनविरुद्ध शेरेबाजी करण्याची कधीच हिंमत केली नाही.

कॅनडात १९९७ ला झालेल्या सहारा चषक सामन्यात ही घटना घडली होती. डावपेचानुसार पाक संघात नवखा असलेला सकलेन सचिनचे लक्ष विचलित करून त्याला बाद करण्यासाठी त्याच्याविरुद्ध काहीतरी बोलला. त्याचवेळी सचिन माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘मी तुझ्याशी कधीही चुकीचे वागलो नाही, मग तू माझ्याशी असा का वागतोस,’ अशी विचारणा करताच माझी मान शरमेने झुकली. काय बोलावे कळत नव्हते,’ अशी आठवण सकलेनने सचिनच्या ४७ व्या वाढदिवशी शुक्रवारी सांगितली.

सचिनने मला एक माणूस आणि खेळाडू म्हणून मोठा सन्मान देतो, असे म्हणताच त्यानंतर कधीही मी सचिनविरुद्ध चुकीचे न वागण्याची शपथ घेतली. सामन्यानंतर मी सचिनची माफीदेखील मागितली होती, असे सकलेन म्हणाला.

सचिन भला माणूस असल्याचे संबोधून सकलेन पुढे म्हणाला, ‘१९९९ च्या चेन्नई कसोटीत सचिनने १३६ धावांची शानदार खेळी केली. सामन्यात दोन्ही वेळा मीच सचिनला बाद केले. एकूण दहा गडी बाद केल्यामुळे आम्ही सामना जिंकू शकलो. सचिन आणि मी आम्ही दोघांनी आपापल्या संघांसाठी प्राण पणाला लावले होते. त्या सामन्याच्या निमित्ताने सचिनसोबत माझे नाव जुळले, यासाठी स्वत:ला भाग्यवान मानतो.’ (वृत्तसंस्था)

Web Title: When Saqlain Mushtaq sledged Sachin Tendulkar only to never sledge him again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.