Join us  

जेव्हा सचिन तेंडुलकरला बाद करून गोलंदाज त्याची ऑटोग्राफ घ्यायला गेला, अन्...

एखादा खेळाडू बाद झाला की तो निराश झालेला असतो किंवा काही वेळा दु:खी झालेला असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 3:32 PM

Open in App

मुंबई : सचिन तेंडुलकर म्हणजे अनेकांच्या गळ्यातील ताईत. सचिन फलंदाजीला आला की त्याला बाद कसे करायचे, हा प्रश्न प्रतिस्पर्धी संघाला पडायचा. गोलंदाजांना घाम फुटायचा. एकेकाळी तर सचिन बाद झाला तर भारत सामना हरणार, असं समीकरणंही तयार झालं होतं. त्यामुळे सचिनची विकेट ही प्रतिस्पर्धी संघांसाठी महत्वाची होती. एकदा तर सचिनची विकेट मिळवून गोलंदाज एवढा आनंदी झाला की चक्क त्याचीच ऑटोग्राफ घ्यायला तो धावत सुटला. पण त्यानंतर नेमकं असं काही घडलं की...

ही गोष्ट आहे 2007ची. हा सामना हैदराबादला झाला होता. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ उभा ठाकला होता. सचिनची विकेट मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जीवाचे रान करत होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ब्रॅड हॉगने सचिनला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी आनंदाच्या भरात हॉग थेट सचिनकडे ऑटोग्राफ मागायला गेला. 

एखादा खेळाडू बाद झाला की तो निराश झालेला असतो किंवा काही वेळा दु:खी झालेला असतो. त्यामुळे बऱ्याचदा बाद झाल्यावर फलंदाज तोडफोड करतानाही दिसतात. काही फलंदाज बॅट आपटून आपला राग व्यक्त करतात. पण बाद झाल्यावर सचिनकडे जेव्हा हॉग ऑटोग्राफ मागायला गेला तेव्हा सचिनने नम्रपणे त्याला ऑटोग्राफ दिली. पण त्यानंतर लिहीले की,  "Never again mate!"

टॅग्स :सचिन तेंडुलकरआॅस्ट्रेलिया