लक्ष्मणाच्या रथी, धोनी सारथी! शंभराव्या कसोटीत दिलं होतं खास गिफ्ट

व्हीव्हीएस लक्ष्मणचं नाव समोर आलं की कोलकाता कसोटीतील 281 धावांची अविस्मरणीय खेळी डोळ्यासमोर उभी राहतेच.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 12:40 PM2018-11-18T12:40:32+5:302018-11-18T12:42:25+5:30

whatsapp join usJoin us
When MS Dhoni drove team India's bus during VVS Laxman's 100th Test | लक्ष्मणाच्या रथी, धोनी सारथी! शंभराव्या कसोटीत दिलं होतं खास गिफ्ट

लक्ष्मणाच्या रथी, धोनी सारथी! शंभराव्या कसोटीत दिलं होतं खास गिफ्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनीसारखा व्यक्ती शोधून सापडणार नाही- लक्ष्मणधोनीची एक आठवण माझ्या नेहमी स्मरणात राहील - लक्ष्मणलक्ष्मणला शंभराव्या कसोटीत दिलं होतं खास गिफ्ट

मुंबई : व्हीव्हीएस लक्ष्मणचं नाव समोर आलं की कोलकाता कसोटीतील 281 धावांची अविस्मरणीय खेळी डोळ्यासमोर उभी राहतेच. या खेळीचा विशेष उल्लेख लक्ष्मणने '281 and Beyond' या आत्मचरित्रात केला आहे. पण, लक्ष्मणने आत्मचरित्रात सांगितलेला एक किस्सा सध्या सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. लक्ष्मणला शंभराव्या कसोटीत नवनिर्वाचित कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं एक विशेष गिफ्ट दिलं होतं. नागपूर कसोटीत धोनीने हॉटेलपर्यंत स्वतः संघाची बस चालवली होती, अशी आठवण लक्ष्मणने सांगितली.

अनिल कुंबळेने 2 नोव्हेंबर 2008 मध्ये निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची दिल्लीत खेळली गेलेला सामना हा त्याचा अखेरचा होता. त्यानंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली. दिल्ली कसोटीत लक्ष्मणने द्विशतकी खेळी केली होती आणि नागपूरमध्ये तो कसोटी सामन्यांचे शतक साजरे करणार होता. त्यावेळी नवनिर्वाचित धोनीने लक्ष्मणला खास गिफ्ट दिले. धोनी चक्क ड्रायव्हर सीटवर बसला आणि हॉटेलपर्यंत त्याने संघाची बस चालवली, अशी आठवण लक्ष्मणने आत्मचरित्रात लिहिली आहे.

''महेंद्रसिंग धोनीची एक आठवण माझ्या नेहमी स्मरणात राहील आणि ती म्हणजे त्याने माझ्या शंभराव्या कसोटीत संघाची बस स्वतः चालवली होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. संघाच्या कर्णधाराने मैदानापासून ते हॉटेलपर्यंत बस चालवली होती. अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर कर्णधार म्हणून धोनीचा तो पहिलाच सामना होता. त्याने लोक काय बोलतील याची पर्वा केली नाही. तो आजही तसाच आहे. खेळाचा आनंद लुटणारा आणि पाय जमिनीवरच ठेवणारा. त्याच्यासारखा व्यक्ती मला सापडला नाही,'' असे लक्ष्मणने लिहीले आहे. 

Web Title: When MS Dhoni drove team India's bus during VVS Laxman's 100th Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.