Join us

ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा होतो धोनी नामाचा गजर, पाहा हा व्हिडीओ

या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये धोनी नाबाद राहीला आणि हे दोन्ही सामने भारताने जिंकले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 14:08 IST

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी हा फक्त भारताचा क्रिकेटपटू राहीलेला नाही, तर संपूर्ण क्रिकेट जगताचा तो राजदूत आहे. त्यामुळे धोनी क्रिकेट विश्वात कुठेही गेला तरी चाहते त्याला डोक्यावर घेतात. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय मालिकेतही ही गोष्ट पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने नाबाद 87 धावांची खेळी साकारली. या एकदिवसीय मालिकेत धोनीने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक साकारले. या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये धोनी नाबाद राहीला आणि हे दोन्ही सामने भारताने जिंकले होते. तिसऱ्या सामन्यासाठी जेव्हा धोनी मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी धोनी नामाचा एकच गजर केला.

पाहा हा खास व्हिडीओ

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया