Join us

हार्दिक पंड्याच्या डोक्यात वीज चमकते तेव्हा...

वातावरणा पावसाचे आहे. वीजाही चमकत आहेत, त्यातलीच एक वीज पंड्याच्या डोक्यात पडकी की काय, असा विचारही तुम्ही करत असाल, पण हार्दिकच्या डोक्यात ती आकाशातली वीज पडलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 19:12 IST

Open in App
ठळक मुद्देआज जेव्हा हार्दिकला मुंबईत पाहिले तेव्हा त्याच्या डोक्यात वीज चमकल्यासारखे वाटत होते.

मुंबई : आपल्या गगनभेदी षटकारांबरोबर भेदक गोलंदाजीसाठी भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्या प्रसिद्ध आहे. पण आज जेव्हा हार्दिकला मुंबईत पाहिले तेव्हा त्याच्या डोक्यात वीज चमकली असे वाटत होते. वातावरण पावसाचे आहे. वीजाही चमकत आहेत, त्यातलीच एक वीज पंड्याच्या डोक्यात पडकी की काय, असा विचारही तुम्ही करत असाल, पण हार्दिकच्या डोक्यात ती आकाशातली वीज पडलेली नाही.

पंड्या आपल्या खेळाबरोबरच अजून एका खेळासाठी प्रसिद्ध आहे आणि ती गोष्ट म्हणजे त्याची हेअर स्टाइल. आतापर्यंत त्याने बऱ्याच हेअर स्टाइल केल्या आहेत आणि त्याच्या प्रत्येक हेअर स्टाईलवर नेहमीच चर्चा झालेली पाहायला मिळते. सध्याच्या घडीला त्याने जी हेअर स्टाइल केली आहे ते पाहता त्यावरही चर्चा होणार, हे मात्र नक्की. 

गोरेगावमधील एका शुटींगसाठी हार्दिक आला होता. तेव्हा त्याची हेअर स्टाइल पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. त्याची हेअर स्टाइल पाहिल्यावर बऱ्याच जणांनी त्याच्या डोक्यात वीज पडली अशी टिप्पणी केली.

हार्दिक पंड्याच्या आतापर्यंतच्या हेअर स्टाइल पाहा...

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रिकेट