Join us

भारत जिंकल्यावर लाराने मारली मिठी, म्हणाला, ‘आपण जिंकलो’! 

एका मुलाखतीत सुनील गावसकर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 06:22 IST

Open in App

नवी दिल्ली :  भारतीय  संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत मिळवलेला विजय सर्वात विशेष आहे. याचा आनंद केवळ भारतीयांना नाही तर परदेशातील खेळाडूंना झाला. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम विजयाचा आनंद वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ब्रायन लारा याने भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्याकडे शेअर केला.

गावसकर या मालिकेत समालोचन करीत होते. ते म्हणाले, ‘चॅनल ७द्वारे आयोजित पार्टीमध्ये लारा माझ्याजवळ आला आणि तो मोठ्याने आपण जिंकलो, आपण जिंकलो, काय शानदार मालिका होती. काय, शानदार मालिका होती, असे म्हणू लागला.’ एका मुलाखतीत गावसकर यांनी लाराला भारतीय संघाच्या विजयाबद्दल किती आनंद झाला होता हे सांगितले. भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाच्या आठवणींसह मी आयुष्यभर आनंदी राहीन. मला आता चंद्रावर असल्यासारखे वाटते, असे लारा त्यांना म्हणाला. लाराच्या या प्रतिक्रियेवरून ही मालिका किती रोमांचक होती याचा अंदाज येतो. 

वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंनादेखील भारताला विजय मिळावा असे वाटत होते. भारतीय संघाने मिळवलेला हा विजय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम मालिका विजय आहे यात दुमत असण्याचे कारण नाही, असे गावसकर म्हणाले.

टॅग्स :सुनील गावसकर