Join us

...जेव्हा लाँग रूममध्ये भिडले खेळाडू; भारत आणि इंग्लंडमध्ये वाद

लॉर्ड्सवरील लॉंगरूममध्ये नेहमी एमसीसी सदस्यांची गर्दी असते. येथूनच दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या जिन्याचा वापर करीत ड्रेसिंग रूममध्ये जातात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 09:12 IST

Open in App

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.यानंतर लॉंगरुममध्ये देखील उभय संघातील खेळाडूंमध्ये चांगलाच शाब्दिक राडा झाल्याचा दावा ‘डेली टेलिग्राफ’च्या वृत्तात करण्यात आला आहे. भारताने पाचव्या दिवशी यजमान संघाला अखेरच्या सत्रात गुडघे टेकायला भाग पाडून सामना १५१ धावांनी जिंकला होता.

वृत्तानुसार,खेळाडू मैदानातून बाहेर जात असताना आपसात बाचाबाची करीत असल्याची छायाचित्रे पुढे आली होती. हा वाद नंतर लाँगरूमपर्यंत गेला. तेथे भारतीय अधिकारी, सहयोगीस्टाफ आणि खेळाडूंची गर्दी होती. सर्वजण खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करीत होते. नाबाद १८० धावांची खेळी करणारा ज्यो रुट आणि विराट कोहली यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये परतताना जोरदार शाब्दिक वाद झाला.

लॉर्ड्सवरील लॉंगरूममध्ये नेहमी एमसीसी सदस्यांची गर्दी असते. येथूनच दोन्ही संघातील खेळाडू आपापल्या जिन्याचा वापर करीत ड्रेसिंग रूममध्ये जातात. कोरोना निर्बंधामुळे मागच्या आठवड्यात खेळाडूंच्या भोजनकक्षासोबतच लॉंग रुमदेखील सदस्यांसाठी बंद करण्यात आले होते. यामुळे मात्र दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांपुढे येण्यास अधिक वेळ मिळाला. मैदानावरील शेरेबाजीचा हा प्रकार पुढे शाब्दिक खडाजंगीत रुपांतरित झाला,’ असे वृत्तात पुढे म्हटले आहे.     शेरेबाजी दरम्यान कुठल्या शब्दांचा वापर झाला, याचा खुलासा मात्र कोहलीने केला नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड
Open in App