Join us

धोनी जेव्हा फुटबॉल खेळतो तेव्हा...

क्रिकेटचा सराव चांगला सुरु असताना धोनी फुटबॉल का खेळतो, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच तुम्हाला पडला असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 19:13 IST

Open in App
ठळक मुद्देआयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये 7 एप्रिलला खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

चेन्नई : आयपीएलचा पहिला सामना आता काही तासांवर येऊन ठेपला आहे, त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता फुटबॉल का खेळतो, असा सवाल तुम्हाला पडला असेल. यापूर्वी सराव करताना धोनी उत्तुंग षटकार ठोकतानाचे साऱ्यांनेच पाहिले आहे. पण मग क्रिकेटचा सराव चांगला सुरु असताना धोनी फुटबॉल का खेळतो, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच तुम्हाला पडला असेल.

आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये 7 एप्रिलला खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

धोनी आपल्या संघासह चेन्नईमध्ये सराव करत आहे. पण या सरावातून काही काळ विरंगुळा म्हणून धोनी फुटबॉल खेळला. धोनीचे यष्टीरक्षण आणि फलंदाजी साऱ्यांनीच पाहिली आहे. त्याचबरोबर एक कर्णधार म्हणून त्याच्या चाणाक्ष रणनितीही आपण पाहिल्या आहेत. पण धोनी हा फुटबॉलचाही चाहता आहे. त्यामुळे त्याने सरावादरम्यान फुटबॉल खेळण्याचे ठरवले. तो फुटबॉल खेळण्यातही माहिर आहे, हे व्हीडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीआयपीएल 2018