लग्नाची ऑफर देणाऱ्या 'या' क्रिकेटरला विराटने दिलं होतं खास गिफ्ट, त्याचाच वापर करणार भारताविरोधातील सामन्यात

तिने विराटला लग्नासाठीही विचारणा केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 10:23 IST2018-03-13T10:23:12+5:302018-03-13T10:23:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
this is what virat kohli did when england womens team ricketed anielle wyatt placed her marriage proposal | लग्नाची ऑफर देणाऱ्या 'या' क्रिकेटरला विराटने दिलं होतं खास गिफ्ट, त्याचाच वापर करणार भारताविरोधातील सामन्यात

लग्नाची ऑफर देणाऱ्या 'या' क्रिकेटरला विराटने दिलं होतं खास गिफ्ट, त्याचाच वापर करणार भारताविरोधातील सामन्यात

मुंबई- गेल्यावर्षी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडची महिला क्रिकेट टीम सतत शानदार प्रदर्शन करते आहे. नुकतंच इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाविरोधात टी-20 सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळविला. तेव्हा इंग्लंडच्या डॅनिअल वेटने 56 चेंडूत शतक ठोकून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं. डॅनिअल वेट ही टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची मोठी चाहली आहे. तिने विराटला लग्नासाठीही विचारणा केली होती. विराटने त्याच्या या मोठ्या फॅनला बॅट गिफ्ट केली होती. वेटने विराटने गिफ्ट दिलेल्या बॅटनेच टी-20मधील कठीण शतक लगावलं होतं, अशी चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात मार्चच्या अखेरीस होणाऱ्या त्रिकोणी मालिकेत डॅनिअल वेट विराटने गिफ्ट दिलेल्या बॅटचा वापर क्रिकेटच्या मैदानात करणार आहे. 'मी क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यावेळी विराटने गिफ्ट दिलेल्या बॅटचाच वापर करते, असं डॅनिअलने आधी म्हंटलं आहे. त्यामुळे भारताविरोधात वेट तिच बॅट वापरणार असल्याचं बोललं जातं आहे. 

2014मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यावेळी डॅनिअल वेट व विराट कोहलीची भेट झाली होती. तेव्हा विराट कोहलीने डॅनिअलला बॅट गिफ्ट दिली होती. त्याचवर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विराटच्या 72 धावांच्या खेळीने डॅनिअल चांगलीच प्रभावित झाली होती. तेव्हा तिने विराटला लग्नासाठीही मागणी घातली. डॅनिअलने ट्विट करत विराटला लग्नाची मागणी घातली होती पण विराटने अत्यंत खुबीने तिच्या या मागणीला नकार दिला. पण त्यानंतर कॅप्टन कोहलीने डॅनिअलला स्वतःची बॅट गिफ्ट दिली होती. डॅनिअल व विराटची ती भेट त्यावेळी चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती. वेटने विराट कोहलीकडून मिळालेल्या बॅटचं नाव बीस्ट ठेवलं आहे. 
 

Web Title: this is what virat kohli did when england womens team ricketed anielle wyatt placed her marriage proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.