What Is Test Twenty Cricket's Latest Format Explained : क्रिकेटच्या मैदानातील पारंपारिक कसोटीनंतर मर्यादीत षटकांच्या सामन्यातील एकदिवसीय क्रिकेट (५० षटकांचा सामना) प्रकार लोकप्रिय झाला. सध्याच्या घडीला आधुनिक क्रिकेटमधील छोट्या प्रारुपात खेळवण्यात येणारी टी-२० स्पर्धा अधिक लोकप्रिय होताना दिसते. बदलत्या काळासह क्रिकेटचा जुन्या प्रकार मोडीत निघणार का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आता कसोटीला ट्वेंटीचा तडका!
कसोटीतील रंगत वाढवण्यासाठी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसारखी स्पर्धा सुरु करण्यात आली. परिणामी अनिर्णित राहणारे सामने रंगतदार होऊ लागले. सध्याच्या घडीला कसोटीत बहुतांश सामन्यांचा निकाल लागल्याचे पाहायला मिळते. आता पारंपरिक कसोटीला ट्वेंटीचा तडका देणारी नवी स्पर्धा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. इथं जाणून घेऊयात कसोटी आणि टी-२० चं ट्विस्ट देत आयोजित करण्यात येणाऱ्या Test Twenty क्रिकेटचा नवा प्रकार नेमका कसा असेल? या स्पर्धेत किती संघ सहभागी होतील? यासंदर्भातील सविस्तर माहिती
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
कसा असेल क्रिकेटमधील टेस्ट ट्वेंटीचा नवा प्रकार? जाणून घ्या त्यातील खासियत
क्रिकेटमधील नव्या प्रकारासंदर्भात जी माहिती समोर आलीये, त्यानुसार भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगसह ऑस्ट्रेलियन मॅथ्यू हेड, वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर क्लाइव्ह लॉयड आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स या नव्या प्रकारातील क्रिकेटशी कनेक्ट आहेत. टेस्ट-टी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येणारी स्पर्धा ही प्रत्येकी ८०-८० षटकांची असेल. या स्पर्धेतील प्रत्येक संघ २०-२० षटकांचे दोन डाव खेळेल. खास गोष्ट ही की, एका दिवसात सामना संपेल.
या स्पर्धेत किती संघ अन् कोणते खेळाडू भाग घेणार?
टेस्ट ट्वेंटीच्या पहिले दोन हंगाम भारतात खेळवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या देशात ही स्पर्धा खेळवण्यात येईल. सुरुवातीच्या काळात १३-१९ वर्षांखालील स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. टेस्ट ट्वेंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत ६ फ्रेंचायझी संघ सहभागी होतील. लवकरच ते संघ कोणते संघ मालक कोण असणार आणि खेळाडूंची निवड कशी केली जाणार? यासंदर्भातील माहिती समोर येईल.