टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत मालिकेवर पकड मजबूत केली. इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या वादळी अर्धशतकांमुळे भारताने २०९ धावांचे विशाल लक्ष्य अवघ्या १५.२ षटकांत गाठले. या विजयानंतर अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याने पत्रकार परिषदेत ड्रेसिंग रूममधील काही मजेशीर किस्से आणि खेळाडूंच्या टोपणनावांचा खुलासा केला.
इशान किशनने केलेल्या ७६ धावांच्या आक्रमक खेळीबद्दल बोलताना शिवम दुबे म्हणाला की, "इशान हा मी पाहिलेल्या सर्वोत्तम डावखुऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याची फलंदाजी इतकी स्फोटक आहे की, ड्रेसिंग रूममध्ये सर्वजण त्याला 'छोटा पॉकेट ब्लास्ट' या टोपणनावाने हाक मारतात. "इशान पहिल्या सामन्यात लवकर बाद झाला होता, पण त्याच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास होता. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये जे केले, तेच आज आंतरराष्ट्रीय स्तरावर करून दाखवले. त्याची फलंदाजी पाहताना आम्हाला खूप आनंद झाला."
पहिल्या टी-२० मध्ये अपयशी ठरलेल्या इशानने रायपूरमधील दुसऱ्या टी-२० मध्ये स्फोटक खेळी केली, त्याने फक्त ३२ चेंडूत ७६ धावा केल्या आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. सामनावीर म्हणून निवडण्यात आल्यानंतर इशान किशनने सांगितले की, त्याला संघातून वगळल्यानंतर त्याने फक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा काढण्यावर लक्ष केंद्रित केले. कधीकधी स्वतःसाठी हे करणे महत्वाचे असते, जेणेकरून तुम्ही कसे फलंदाजी करत आहात आणि तुम्ही पुन्हा टीम इंडियासाठी खेळण्यास पात्र आहात का याबद्दल तुमच्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता."
इशान किशन डिसेंबर २०२३ पासून टीम इंडियाच्या बाहेर होता. त्यानंतर इशानने अचानक दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली. याचा अर्थ पुढील दोन वर्षांसाठी त्याला बाजूला ठेवण्यात आले. त्यानंतर त्याने या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ५०० हून अधिक धावा काढल्यानंतर संघात पुनरागमन केले.
Web Summary : Ishan Kishan's explosive batting earned him the nickname 'Chota Pocket Blast'. After being dropped, Kishan focused on domestic cricket, scoring over 500 runs. His recent performance reflects his dedication and resurgence in Team India.
Web Summary : ईशान किशन की विस्फोटक बल्लेबाजी ने उन्हें 'छोटा पॉकेट ब्लास्ट' उपनाम दिलाया। टीम से बाहर होने के बाद, किशन ने घरेलू क्रिकेट पर ध्यान केंद्रित किया, 500 से अधिक रन बनाए। उनका हालिया प्रदर्शन उनके समर्पण और टीम इंडिया में पुनरुत्थान को दर्शाता है।