Join us  

'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? अभिनेत्री उर्वशी रौतेलाने यष्टिरक्षक रिषभ पंतच्या भेटीचा सांगितला किस्सा, Video 

रिषभ पंत ( Rishabh Pant) हा भारताचा स्टार बनला आहे... आक्रमक फलंदाजीमुळे रिषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:27 AM

Open in App

रिषभ पंत ( Rishabh Pant) हा भारताचा स्टार बनला आहे... आक्रमक फलंदाजीमुळे रिषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः कसोटी क्रिकेटला त्याने त्याच्या आक्रमक व नाविण्यपूर्ण फटकेबाजीने पुनर्जिवीत केले. इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनला त्याने मारलेला रिव्हर्स षटकार हा आजही चाहत्यांच्या डोळ्यासमोर ताजा आहे. ऑस्ट्रेलियन धर्तीवर रिषभने कसोटी मालिकेत दाखवलेली परिपक्वता, इतिहास घडवणारी ठरली होती. क्रिकेटचं मैदान गाजवणारा रिषभ खाजगी आयुष्यातही नेहमी चर्चेत राहिला आहे आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) हिच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले. 

अभिनेत्रीला भेटण्यासाठी रिषभला १६ तास प्रतीक्षा करावी लागली होती आणि त्यानंतर रिषभ-उर्वशीच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. पण, रिषभने २०२०मध्ये प्रेयसी इशा नेगीसोबतचा फोटो पोस्ट करून या चर्चांना पूर्णविराम लावला. तरीही उर्वशी अन् रिषभ यांच्या त्या पहिल्या भेटीची उत्सुकता आजही कायम आहे आणि प्रथमच त्यावर बॉलिवूड अभिनेत्रीने मौन सोडले आहे. उर्वशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात एका मुलाखतीत तिने रिषभसोबतच्या त्या भेटीवर स्पष्ट मत मांडले आहे.

उर्वशी वाराणसी येथून एक शूटींग संपवून दिल्लीत दाखल झाली होती. त्यावेळी रिषभ तिला भेटण्यासाठी दिल्लीत गेला होता आणि त्याला १६-१७ तास वाट पाहावी लागली होती. उर्वशीने सांगितले की,''मी वाराणसीहून शूटींग संपवून दुसऱ्या प्रोजेक्टसाठी दिल्लीत दाखल झाली. वेळापत्रक एवढं व्यग्र होतं की मला कोणाला भेटण्याचीही वेळ नव्हती. दिल्लीत शुटींग करून झाल्यानंतर मी एवढी थकली होती की १० तास झोपून राहिले. त्या दरम्यान ६०-७० मिस्ड् कॉल माझ्या मोबाईलवर येऊन गेले होते. उठल्यावर ते मी पाहिले. ती व्यक्ती ( तिने रिषभचं नाव नाही घेतलं) मला भेटण्यासाठी वाट पाहत होती आणि त्यानंतर मी त्याला भेटले. मीडियाने ही गोष्ट एवढी रंगवली की...''रिषभ पंत आशिया चषक स्पर्धेसाठी तयारीला लागला आहे. इंग्लंड दौरा गाजवल्यानंतर रिषभने विंडीज दौऱ्यावरही चांगली कामगिरी केली आहे. आता आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आदी संघाचा सामना करण्यासाठी तो तयार आहे. रिषभने ३१ कसोटींत ४३.३२च्या सरासरीने २१२३ धावा केल्या आहेत. २७ वन डेत ८४० व ५४ ट्वेंटी-२०त ८८३ धावा त्याच्या नावावर आहेत. 

टॅग्स :रिषभ पंतउर्वशी रौतेला
Open in App