Join us

लखनऊचे मालक केएल राहुलला काय बोललेले? सुपरजायंटच्या गोलंदाजाने घेतली गोएंकांची बाजू

Sanjiv Goenka - KL Rahul Clash IPL: लखनऊला सनरायझर्स हैदराबादकडून १० विकेटनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर संजीव गोएंका केएल राहुलला झापत असल्याचा व्हिडीओ आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:13 IST

Open in App

यंदाची आयपीएलची मालिका दोन वादांनी गाजली होती. एक म्हणजे रोहित शर्माला डावलून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने कप्तानी दिली त्याचा आणि दुसरा म्हणजे सामने हरल्यानंतर केएल राहुलला लखनऊ सुपरजायंटसंघाच्या मालकाने झापल्याचा. यावरून चाहत्यांनी संघ मालकांना कमालीचे ट्रोल केले होते. आता केएल राहुलला त्याच्या संघाचा मालक काय बोलला ते समोर आले आहे. 

लखनऊला सनरायझर्स हैदराबादकडून १० विकेटनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर संजीव गोएंका केएल राहुलला झापत असल्याचा व्हिडीओ आला होता. यावरून क्रिकेट चाहत्यांनी गोएंकांवर जहरी टीका केली होती. त्यांच्यात काय बोलणे झाले हे काही समजू शकल नव्हते. ना केएल राहुलने यावर भाष्य केले होते. ना गोएंकांनी यावर खुलासा केला होता. आता यावर संघाचा फिरकीपटू अमित मिश्राने खुलासा केला आहे. 

एका युट्यूब चॅनलसोबत बोलताना मिश्राने गोएंका निराश होते असे म्हटले आहे. आम्हाला केकेआर आणि हैदराबादविरोधात सलग पराभव पत्करावा लागला होता. हैदराबादची मॅच तर १० ओव्हरमध्येच संपली होती. आम्ही नेट प्रॅक्टीससाठी त्यांना गोलंदाजी करत आहोत, असे आम्हाला वाटू लागले होते. जर मी एवढ्या रागाने बोलत असेन तर ज्या व्यक्तीने टीमसाठी पैसा लावला आहे त्याला राग येणार नाही का, असा सवाल शर्माने करत गोएंकांचा राग योग्यच होता असे म्हटले आहे. 

ही काही मोठी गोष्ट नव्हती. नंतर मला त्यांच्यात काय चर्चा झाली ते समजले. आमची गोलंदाजी खूपच खराब झाल्याचे ते म्हणाले होते आणि टीमने लढायला हवे होते. टीमने सरेंडर केले असे त्यांना वाटत होते. मला वाटते ही गोष्ट मीडिया आणि लोकांनी वाढविली, असेही मिश्रा म्हणाला. 

राहुलला लखनऊ कप्तानपदी ठेवणार का? तो खेळाडू भारतीय संघात आहे की नाही याने काही फरक पडत नाही. परंतू टी२० साठी योग्य मानसिकता ठेवणाऱ्या व्यक्तीला कप्तान करायला हवे. टीमसाठी खेळणाऱ्याला कप्तान करायला हवे. मला वाटते लखनऊ एक चांगल्या कप्तानसाठी शोध सुरु करेल, असे मिश्राने राहुलला लखनऊ संघात ठेवणार की नाही या प्रश्नावर उत्तर दिले. 

टॅग्स :लोकेश राहुलआयपीएल २०२४लखनौ सुपर जायंट्स