Join us  

काहीही हं... टॉस जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं काय केलं बघा!

या गोष्टीचा खुलासा दस्तुरखुद्द पेनने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:15 PM

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार कधी काय करतील, याचा काही नेम नाही. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण महत्वाचे असते. पण काही वेळा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंग करतात. समोरच्या खेळाडूला शाब्दिक हल्ल्याने घायाळ करून त्याची मानसीकता बिघडवण्याचा प्रयत्न करतात. आता तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने तर हद्दच केली. टॉस जिंकण्यासाठी पेनने अशी एक गोष्ट केली. ही गोष्ट तुम्हा ऐकली तर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

भारताने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद पेनकडेच होते. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-1 असा दमदार विजय मिळवला होता. हा भारताचा आतापर्यंतचा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी मालिका विजय होता.

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. गेल्या सात सामन्यांसाठी पेन जेव्हा नाणेफेकीसाठी मैदानात आला होता, तेव्हा त्याला एकदाही नाणेफेक जिंकता आली नव्हती. त्यामुळे आता सलग आठव्यांदा जेव्हा पेन नाणेफेकीसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याने एक शक्कल लढवली. यावेळी जेव्हा पेन मैदानात आला तेव्हा सामनाधिकारी आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ मैदानात होते. पेनने यावेळी त्यांच्याकडून नाणे घेतले. नाणे घेतल्यावर पेनने पहिल्यांदाच डाव्या हाताने ते उडवले. यापूर्वी उजव्या हाताने सात वेळा त्याने नाणे उडवले होते. त्यावेळी तो सात पैकी सातही वेळा नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला नव्हता. त्यामुळे यावेळी त्याने डाव्या हाताने नाणेफेक केली आणि चक्क तो जिंकला. या गोष्टीचा खुलासा दस्तुरखुद्द पेनने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड  केली होती. या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामन्याच्या उर्वरीत दोन दिवसांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी यष्टीरक्षक टीम पेनकडे सोपवण्यात आली होती.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाश्रीलंका