Join us

IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...

जाणून घेऊयात या नियमात नेमका काय बदल झालाय? त्याचा फ्रँचायझी संघाला कसा फायदा होईल त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:34 IST

Open in App

What Are Temporary Replacements New Rules Of IPL 2025 :  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धेला ब्रेक लागला होता. दोन्ही देशांच्या संमतीने शस्त्रसंधीची घोषणा झाल्यावर आयपीएलमधील उर्वरित सामने पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रद्द करण्यात आलेल्या सामन्यासह उर्वरित १७ सामन्यांचे सुधारित वेळापत्रकासह बीसीसीआयने स्पर्धेत नवा नियमही लागू केला आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यावर अनेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले असून त्यातील काही खेळाडू पुन्हा आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परिस्थितीत IPL फ्रँचायझी संघाचे टेन्शन कमी करण्यासाठी बीसीसीआयने बदली खेळाडूसंदर्भातील नियम नव्या तरतुदीसह लागू केलाय.  जाणून घेऊयात या नियमात नेमका काय बदल झालाय? त्याचा फ्रँचायझी संघाला कसा फायदा होईल त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

तात्पुरत्या स्वररुपात खेळाडूंना रिप्लेस करण्याची मुभा

आयपीएल नियमानुसार, दुखापतग्रस्त असणाऱ्या किंवा आजारी असलेल्या खेळाडूच्या रुपात बदली खेळाडूचा संघात समावेश करण्याचा नियम आधीपासूनच लागू आहे. पण हा नियम स्पर्धेतील पहिल्या  १२ सामन्यांसाठी होता. त्यानंतरच्या सामन्यात हा नियम लागू नव्हता. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यावर पुन्हा उर्वरित सामने खेळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी बीसीसीआयने फ्रँचायझी संघांना तात्पुरत्या स्वरुपात बदली खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार

अनसोल्ड खेळाडूलाही मिळणार भाव; पण...

बदली खेळाडूसंदर्भातील नियमानुसार, फ्रँचायझी संघांना बदली खेळाडूच्या रुपात फक्त अशा खेळाडूला घेता येईल, ज्याने आयपीएलमध्ये नाव नोंदणी केली होती. याचा अर्थ अनसोल्ड राहिल्या खेळाडूला या नियमानुसार वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळू शकते. ज्या खेळाडूच्या जागी तो संघात येणार आहे, त्या खेळाडूपेक्षा अधिक प्राइज टॅग असणाऱ्या गड्याचा संघात समावेश करता येऊ शकत नाही. एवढेच नाही तर बदली खेळाडूच्या रुपात संघात आलेल्या खेळाडूला पुढच्या हंगामासाठी रिटेन करता येणार नाही. पुढच्या वेळी त्याला लिलावातच उतरावे लागेल.

नव्या नियमासह दिल्ली कॅपिटल्सनं आपला डावही खेळला

यंदाच्या हंगामात बदली खेळाडूच्या नव्या नियमासह दिल्ली कॅपिटल्सनं ९कोटींसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेला जेक फ्रेझर-मॅकगर्क हा ऑस्ट्रेलियन खेळाडू उर्वरित IPL सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने बांगलादेशच्या  मुस्तफिजुर रहमान याला ६ कोटींसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेआधी झालेल्या मेगा लिलावात २ कोटी बेस प्राइजसह त्याने नाव नोंदणी केली होती. पण तो अनसोल्ड राहिला होता. त्याला भाव मिळाल्यावर तो खेळणार की, नाही असाही मुद्दा सध्या चर्चेत आहे. कारण भारताचे विमान पकडण्याऐवजी तो दुबईला रवाना झाला आहे. १७ आणि १९ मेला बांगलादेश दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. तो या मालिकेनंतर दिल्ली कॅपिटल्सला जॉईन होणार की, मालिका संपवून तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार तेही पाहण्याजोगे असेल.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५बीसीसीआयइंडियन प्रीमिअर लीगदिल्ली कॅपिटल्स