Join us

Virat Kohli च्या फ्युचरचं काय? शाहिद आफ्रिदीनं पाच शब्दांत दिलं योग्य उत्तर

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या भविष्यावर आपले मत मांडलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:16 IST

Open in App

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या भविष्यावर आपले मत मांडलं आहे. आफ्रिदीला एका चाहत्यानं ट्विटरवर विराट कोहलीच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला होता, ज्याला त्यानं पाच शब्दात उत्तर दिलं. विराट कोहलीनं नोव्हेंबर २०२० मध्ये आपल्या कारकिर्दीतील शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं होतं, तेव्हापासून त्याला अद्याप शतक झळकावता आलेलं नाही. विराटच्या फॉर्मबद्दल अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपलं मत मांडलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनीही विराटला संघातून वगळण्याबाबत वक्तव्य केलं होतं.

आशिया चषक २०२२ या स्पर्धेत २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासह विराट इंग्लंड दौऱ्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. भारताच्या वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातून विराटला विश्रांती देण्यात आली. या ब्रेकनंतर विराट पुन्हा एकदा दमदार कामगिरी करण्यासाठी परतेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.

आफ्रिदीने ट्विटरवर #AskLala सेशल चालवले होते. यावर एका फॅनने विराट कोहलीचं फ्युचर काय? असा सवाल केला होता. यावर आफ्रिदीनंही उत्तर देत ते फक्त त्याचाच हातात आहे (It’s in his own hands) असं उत्तर दिलं. दरम्यान, तो पुन्हा एकदा आपल्या फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा फॅन्स व्यक्त करत आहेत.

टॅग्स :विराट कोहलीशाहिद अफ्रिदी
Open in App