Join us

स्मृती मानधनाची फटकेबाजी; पाडला 11 चौकारांचा पाऊस

भारतीय महिला संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाने लंडन येथे सुरू असलेल्या महिलांच्या सुपर ट्वेंटी-20 लीगमध्ये जोरदार फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 14:00 IST

Open in App

लंडन : भारतीय महिला संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाने लंडन येथे सुरू असलेल्या महिलांच्या सुपर ट्वेंटी-20 लीगमध्ये जोरदार फटकेबाजी केली. वेस्टर्न स्टॉर्म क्लबचे प्रतिनिधित्व करताना स्मृतीनं यॉर्कशायर डायमंड्स संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्मृतीनं 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना संघाला 9 विकेट व 31 चेंडू राखून विजयही मिळवून दिला. 

यॉर्कशायर डायमंड्स संघाने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 151 धावा उभ्या केल्या. हॉली आर्मीटेजच्या ( 59) अर्धशतकी खेळीच्या जोरावर डायमंड्सने ही मजल मारली. याच संघाकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताच्या जेमिमा रॉड्रीगेजने 22 चेंडूंत 28 धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना राचेल प्रिस्ट आणि स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करताना वेस्टर्न स्टॉर्मचा विजयाचा मार्ग सोपा केला. दोघींनी 13.5 षटकांत 133 धावा चोपल्या. स्मृतीने 47 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकारासह 70 धावांची खेळी केली. राचेल 43 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 72 धावांवर नाबाद राहिली.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेट