Join us

पश्चिम विभागने पुनरागमन करत पटकावला दुलीप चषक

दुसऱ्या डावात २६५ धावांची जबरदस्त खेळी केलेल्या यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 07:13 IST

Open in App

कोईम्बतूर :  पिछाडीवर पडलेल्या पश्चिम विभागाने पुनरागमन करत दक्षिण विभागाला तब्बल २९४ धावांनी धूळ चारत दिमाखात दुलीप चषक पटकावला. ५२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण संघाचा डाव ७१.२ षटकांमध्ये २३४ धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या डावात २६५ धावांची जबरदस्त खेळी केलेल्या यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

चौथ्या दिवस अखेरीसच पश्चिम विभागाने दक्षिण संघाची ६ बाद १५४ धावा अशी अवस्था केली होती. मुंबईकर फिरकीपटू शम्स मुलानीने दक्षिणच्या फलंदाजीला खिंडार पाडत ५४ धावांत ४ बळी घेतले. 

जयदेव उनाडकट व अतित शेठ यांनीही प्रत्येकी २ बळी घेतले. चिंतन गजा व तनूष कोटियन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दक्षिणकडून सलामीवीर रोहन कुन्नुमलने १०० चेंडूंत १४ चौकार व एका षटकारासह ९३ धावांची खेळी केली. रवि तेजाने ९७ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ५३ धावा केल्या. 

टॅग्स :अजिंक्य रहाणे
Open in App